22 November 2024 5:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मुख्यमंत्री बॉलिवूडमधून बाहेर पडले आणि बांधावर गेल्याने...काय म्हणाले आशिष शेलार?

BJP MLA Ashish Shelar, to CM Uddhav Thackeray, Solapur Tour

मुंबई, १९ ऑक्टोबर : राज्यात आजी आणि माजी मुख्यमंत्री परतीचा पाऊस आणि पुरामुळे काही भागांत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे त्याची पाहणी करत आहेत. यादरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या पाहणी दौऱ्यावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी खोचक टीका केली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आशिष शेलार यांनी “देर आए, दुरुस्त आए”, असा टोला मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याला लगावला आहे. तसेच मुख्यमंत्री बॉलिवूडमधून बाहेर पडून बांधावर गेल्याने शेतकऱ्यांना काहीतरी न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

“विश्वासघाताने तयार झालेले हे सरकार आत्मविश्वास विरहीत आहे. त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात आत्मसन्मानाची भावना असणे सोईचे नाही. तर शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत द्यावी की केंद्राने हा मुद्दा महत्त्वाचा नाही. कुठूनही मदत मिळो, पण शेतकऱ्यांना कर्ज मिळणे अपेक्षित असल्याचे शेलार यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील वक्तव्याबद्दल केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलेल्या नाराजीविषयी आशिष शेलार यांना विचारले असताअमित शाह यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर भाजपच्या इतर कोणत्याही नेत्यांनी टिप्पणी करणे योग्य नसल्याचे सांगत शेलार यांनी या मुद्द्यावर बोलणे टाळले आहे.

दरम्यान, दौऱ्याला सुरुवात झाल्यानंतर नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मी तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे, तुम्ही एकटे नाही, कोणीही वाऱ्यावर पडलं नाही, आपलं सरकार हे तुमचं सरकार आहे, तुमच्या पाठिशी आहे, तुम्हाला धीर द्यायला आलो आहे, काळजी करू नका, नुकसान भरपाई देऊ पण कोणाचेही जीव जाऊ देऊ नका. सावध राहा, किती नुकसान झालंय याचे पंचनामे सुरु आहे, माहिती गोळा केली जात आहे पण माहिती गोळा करून त्याचा अभ्यास करत बसणार नाही, हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, लवकरच मदत जाहीर करू असं त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं आहे. तसेच विरोधी पक्षाने राजकारण करू नये, राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही, आपत्ती काळात केंद्र आणि राज्य असं काही करू नये, केंद्राकडून राज्याला जे देणं आहे असेल ते केंद्र सरकारने द्यावे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.

 

News English Summary: The grandmother and former chief minister of the state are inspecting the return of rains and floods that have caused severe damage to agriculture in some areas. Meanwhile, BJP MLA Ashish Shelar has sharply criticized Uddhav Thackeray’s inspection tour. While interacting with the media, Ashish Shelar has lashed out at the Chief Minister’s visit saying, “Der aye, Durust Aye.” He also hoped that the farmers would get some justice as the Chief Minister left Bollywood and went to the dam.

News English Title: BJP MLA Ashish Shelar to CM Uddhav Thackeray visit to Solapur News Updates.

हॅशटॅग्स

#Ashish Shelar(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x