18 April 2025 5:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Power Share Price | 15 रुपयाचा जेपी पॉवर शेअर खरेदी करा, यापूर्वी 2111% परतावा दिला - NSE: JPPOWER NTPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल 30 टक्के अपसाईड परतावा - NSE: NTPC Rama Steel Share Price | 9 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करणार, डिफेन्स क्षेत्रात प्रवेश, फायद्याची अपडेट - NSE: RAMASTEEL IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | 1,988 टक्के परतावा देणारा डिफेन्स कंपनी स्टॉक खरेदी करा, संधी सोडू नका - NSE: APOLLO Rattan Power Share Price | 10 रुपयाचा पेनी स्टॉक देईल मोठा परतावा, यापूर्वी दिला 627% परतावा - NSE: RTNPOWER BHEL Share Price | अशी संधी सोडू नका, मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, टार्गेट जाणून घ्या - NSE: BHEL
x

पाकिस्तानची साखर, एपीएमसीतील व्यापार्‍यांना मनसेचा दम

नवी मुंबई : देशातील शेतकऱ्यांचे हित लक्षात न घेता मोदी सरकारने पाकिस्तानातून आयात केलेली साखर ही राज्यातील साखर उत्पादकांच आणि शेतकऱ्यांच आर्थिक दृष्ट्या कंबरडं मोडणारी असल्याने त्याची विक्री इथल्या व्यापाऱ्यांनी त्वरित थांबवावी, नाहीतर मनसे शेतकऱ्यांसाठी कायदा हातात घेईल असा थेट इशाराच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापार्‍यांना दिला गेला आहे.

कारण देश भक्तीचे गोडवे गाणाऱ्या मोदी सरकारने महाराष्ट्रातील ऊस उत्पादक तसेच साखर कारखाने संकटात असताना लाखो मेट्रिक टन साखर पाकिस्तानमधून आयात केली आहे. पाकिस्तान मधून आयात केलेल्या साखरेचा भाव इथल्या बाजार भावापेक्षा १ रुपयाने कमी आहे. मागच्या हंगामातील जवळपास दोन ते अडीच लाख टन साखर पडून आहे आणि यंदा जवळपास ६० ते ६५ लाख टन इतकं अधिक साखरेचे उत्पादन झाले आहे. देशात आधीच इतका प्रचंड साखरेचा साठा पडून असताना केंद्राने पाकिस्तानमधून साखर आयात करण्याची काय गरज होती असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

यंदा झालेले साखरेचे प्रचंड उत्पादन पाहता साखरेचे हे दर आणखी खाली येण्याची दाट शक्यता आहे आणि त्यातच पाकिस्तानची साखर बाजारात दाखल झाल्याने साखरेचे दर आणखी खाली येण्याची शक्यता असल्याने हा प्रयोग म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्या सारखा आहे असा आरोप शेतकरी आणि साखर उत्पादक करत आहेत.

स्थानिक शेतकरी व साखर उत्पादक संकटात असताना पाकिस्तानातून साखर आयात करणाऱ्या आणि देशभक्तीचा आव आणणार्‍या मोदी सरकारला याची जाणीव नाही की काय ? की मागच्या २ वर्षात तुरडाळीचा घोळ करून या सरकारला या वर्षी साखर उद्योग अडचणीत आणून ऊस उत्पादक शेतकरी याचे कंबरडे मोडायचे आहे का ? असा सवाल मनसे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांनी विचारला आहे. पाकिस्तानमधील चिस्तीयन आणि लालूवल्ली सिंध या ब्रॅण्डची साखर नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाली असून या साखरेच्या गोणींवर पाकिस्तान शुगरचा शिक्का आहे.

देशातील आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातील शेतकरी सहकाराने व जिल्हा बँका आणि खाजगी सावकारांकडून कर्ज काढून ऊस उत्पादन करतो. पण भाजप सरकार पाकिस्तानातून स्वस्त साखर महाराष्ट्रात आयात करून शेतकर्‍यांवर अन्याय करतय आणि आपले बेगडी देशप्रेम दाखवत असल्याचे मनसेने म्हटले आहे. मोदी-फडणवीसांनी ही साखर घेऊन जाऊन आपल्या घरी चहा प्यावा. मात्र महाराष्ट्रातील जनता ही साखर घेणार नाही आणि कोणत्याही व्यापार्‍याने ही साखर विकण्याचा प्रयत्न केला तर त्याला मनसे आपल्या पद्धतीने उत्तर देईल असा इशारा मनसे उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे यांनी दिला आहे. आम्ही लवकरच एपीएमसीतील सर्व व्यापार्‍यांना याबाबतचे पत्र देणार असल्याचे मनसेने म्हटले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या