22 November 2024 1:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मातृभाषेचं महत्व त्यांनाही आहे | फक्त ते त्यांच्या निदर्शनास आणा | मनसेने पुन्हा सिद्ध केलं

Amazon group, sends email, MNS agreed, Raj Thackeray

मुंबई, २० ऑक्टोबर : मराठी भाषेसाठी नेहमीच आग्रही आणि आक्रमक असणाऱ्या मनसेने भाषेबद्दलच्या ठामपणावर पून्हा एक गोष्ट सिद्ध केली आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेची थेट अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांनीही दखल घेतली आहे. अॅमेझॉन.इन या अॅपमध्ये मराठी भाषेला प्राधान्य देण्याची मनसेची मागणी त्यांनी मान्य केली आहे आणि त्याबतात अधिकृत ई-मेल देखील शेअर केला आहे.

मनसेचे अखिल चित्रे यांनी अॅमेझॉनला मराठी भाषेच्या वापरासंदर्भात ई-मेल पाठवला होता. बेजॉस यांच्या वतीनं ‘अॅमेझॉन.इन’च्या जनसंपर्क विभागाने त्यास प्रतिसाद दिला आहे. ‘बेजॉस यांना आपला मेल मिळाला आहे. अॅमेझॉन अॅपमधील त्रुटींमुळं आपल्याला जो मनस्ताप झाला, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित विभागाला तुमच्या तक्रारीबद्दल कळवण्यात आलं असून लवकरच त्यावर कार्यवाही केली जाईल, असं अॅमेझॉननं स्पष्ट केलं आहे.

अखिल चित्रे यांनी अॅमेझॉनच्या या ई-मेलची प्रत ट्विटरवर शेअर केली आहे. मनसेच्या मागणीची खुद्द बेजॉस यांनी दखल घेतली आहे. अॅमेझॉनचं शिष्टमंडळ आज मुंबईत येत असल्याचंही चित्रे यांनी म्हटलं आहे. ‘तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जग तुमची दखल घेतं, असं राजसाहेब म्हणतात,’ असंही चित्रे यांनी आपल्या ट्वीटमध्ये पुढं म्हटलं आहे.

 

News English Summary: The MNS, which has always been insistent and aggressive for the Marathi language, has once again proved its mettle on the language. Jeff Bezos, the founder of Amazon, has also taken note of the role of Maharashtra Navnirman Sena. He has agreed to MNS’s demand to give priority to Marathi language in the Amazon.in app and has also shared the official e-mail.

News English Title: Amazon group sends email to MNS agreed to use Marathi in app News Updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x