22 November 2024 4:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला ते आधी फडणवीसांनी स्पष्ट करावं

Minister Jayant Patil, Devendra Fadnavis, CM Uddhav Thackeray

मुंबई, २० ऑक्टोबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थिल्लरपणा करु नये असं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी झटकू नका असं म्हटलं आहे यावर आपलं काय म्हणणं आहे असं उद्धव ठाकरेंना विचारलं असता फडणवीसांनी दिल्लीत जावं म्हणजे मोदीही घराबाहेर पडतील असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी थिल्लरबाजी करु नये असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“देवेंद्र फडणवीस यांना कोणताही मुद्दा राहिला नाही, म्हणून मुख्यमंत्र्याविषयी त्यांनी असं विधान केलं. असे शब्द वापरणे चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला हे फडणवीसांनी स्पष्ट करावं. प्रत्येक वेळी संकटाचा सामना करताना मुख्यमंत्र्यांनी समजूतदारपणा दाखवला”, असं जयंत पाटील म्हणाले. मुंबईतील पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली.

तसेच, जलयुक्त शिवाराच्या होणाऱ्या चौकशीवरीही जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे. “देवेंद्र फडणवीस यांचा आवज दाबण्यासाठी जलयुक्त शिवार चौकशी असं कोणी सांगितलं? कॅगने काही तपास केला. फडणवीस यांनी भ्रष्टाचार केला असं कोणीही म्हटलं नाही. त्यांनी अंगाला लावून घेऊ नये, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. भाजपने चिंता करु नये, त्यांनी काही केलं नाही तर घाबरु नये. कॅग रिपोर्ट आला म्हणून चौकशी”, असं त्यांनी नमूद केले आहे.

 

News English Summary: Devendra Fadnavis has no issue left, so he made such a statement about the Chief Minister. It is wrong to use such words. Fadnavis should explain what thriller the Chief Minister did. The Chief Minister showed understanding every time he faced a crisis, said Jayant Patil. Jayant Patil answered various questions at a press conference in Mumbai.

News English Title: Minister Jayant Patil slams Devendra Fadnavis over statement made against CM Uddhav Thackeray News updates.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x