22 April 2025 5:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

मी या वयात फिरतोय | तु किमान घराबाहेर पड | असंच पवारांना म्हणायंचं असेल

BJP State President Chandrakant Patil, Uddhav Thackeray

पुणे, २० ऑक्टोबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालपासून राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. या आधी मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नव्हते म्हणून विरोधी पक्ष टीका करत होते. तर आता बाहेर पडल्यावरही मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सुरुच आहे. मुख्यमंत्र्यांनी धावत प्रवास करून उपयोग नाही. त्यांनी कोरडा प्रवास करू नये. ते मुख्यमंत्री आहेत. थेट निर्णय घेऊ शकतात. शेतकऱ्यांना थेट मदत देऊ शकतात, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. बाबा, या वयात मी इतका फिरतो तू किमान घराबाहेर पड, असं कादाचित शरद पवारांना म्हणायचं असेल, अशी बोचरी टीकाही यावेळी त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्री हे निर्णय घेऊ शकतात. त्यांनी धावता प्रवास करण्याची गरज नाही. कोरड्या प्रवासातून काहीही निष्पन्न होणार नाही. त्यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचा निर्णय घ्यावा. पंचनामे करण्याचीही गरज नसल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. प्रत्येक वेळी केंद्र केंद्र करायचं नसतं. आपत्तीच्या वेळी पहिली मदत राज्य सरकारने करायची असते. नंतर केंद्राकडे मदत मागायची असते. राज्य सरकारने आधी मदत घोषित करावी, केंद्रकडून जे मिळेल ते बोनस समजायचं, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काल खडसेंबद्दल बोलताना त्यांच्या क्षमतेचं कौतुक केलं होतं. खडसे यांचं कर्तृत्व आणि खानदेशात त्यांचं असलेलं स्थान दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यांच्या कामाची नोंद घेतली जात नसल्याची त्यांची भावना आहे. ही नोंद घेतली जाईल त्या पक्षात जाण्याचा त्यांचा विचार आहे आणि त्यांना एखाद्या पक्षाबद्दल विश्वास वाटत असेल तर त्याला आम्ही काय करू शकतो,’ असं पवार यांनी म्हटलं होतं. पवारांच्या या सूचक वक्तव्यानंतर खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची औपचारिकताच बाकी असल्याचं बोललं जात आहे.

या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता त्यांनी पुन्हा एकदा खडसे भाजपमध्येच राहतील, असा विश्वास व्यक्त केला. ‘नाथाभाऊ हे ज्येष्ठ नेते आहेत. आमचे मार्गदर्शक आहेत. ते कुठेही जाणार नाहीत. पक्षाचं नुकसान होईल असं काहीही करणार नाहीत. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्याशी बोलणं सुरू आहे. सगळं सुरळीत होईल व त्यांच्या पक्षांतराची चर्चा घडवून आणणाऱ्यांचा हिरमोड होईल,’ असं पाटील यांनी सांगितलं.

 

News English Summary: Chief Minister Uddhav Thackeray has been inspecting the rain-hit areas in the state since yesterday. BJP state president Chandrakant Patil has criticized it. Earlier, the opposition was criticizing the Chief Minister for not leaving the house. So now that he is out, the criticism against the Chief Minister is still going on. There is no use in traveling by CM. They should not travel dry. He is the Chief Minister. Can make direct decisions. Chandrakant Patil has said that they can directly help the farmers.

News English Title: BJP State President Chandrakant Patil on Uddhav Thackeray News Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या