24 November 2024 4:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

फेब्रुवारी 2021 पर्यंत देशातील ५०% नागरिक कोरोनाबाधित होतील | सरकारी समितीचा दावा

India, Covid19, Corona Virus

नवी दिल्ली, २० ऑक्टोबर : सरकारी समितीच्या एका अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. समितीच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारी 2021 पर्यंत भारतातील तब्बल 50 टक्के नागरिकांना कोरोनाची बाधा होऊ शकते. राऊटर्सने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केला आहे.

समितीचे सदस्य मानिंद्र अग्रवाल यांनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, फेब्रुवारी 2021 नंतर रूग्णवाढीचे प्रमाण कमी होणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार सोमवार (19 ऑक्टोबर) पर्यंत भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 75 लाखांचा टप्पा पूर्ण केला. सध्या जगात
सर्वात जास्त कोरोनाबाधित अमेरिकेत आहेत. मात्र, भारत आता अमेरिकेच्या जवळ पोहोचला आहे.

मनिंद्र अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी समितीने केलेल्या अभ्यासात आतापर्यंत 30 टक्के भारतीयांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार येत्या फेब्रुवारी पर्यंत देशातील 50 टक्के भारतीय कोरोना बाधित होऊ शकतात, असे मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितले. देशात कोरोना महासाथीविरूद्धच्या युद्धादरम्यान महासाथीचा योग्य अंदाज बाधण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी केद्र सरकारने विषाणु वैज्ञानिकांची (virologists) 10 सदस्यांची समिती स्थापन केली. या समितीला progression of the covid – 19 pandemic in india : prognosis and lockdown impacts असे नाव देण्यात आले आहे. या समितीने आतापर्यंत कोरोना विषाणूसंदर्भात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा तपास केला आहे.

 

News English Summary: India has so far reported 7.55 million cases of the coronavirus and is second only to the United States in terms of total infections. But COVID-19 infections are decreasing in India after a peak in mid-September, with 61,390 new cases reported on average each day, according to a Reuters tally. “Our mathematical model estimates that around 30% of the population is currently infected and it could go up to 50% by February,” Manindra Agrawal, a professor at the Indian Institute for Technology in Kanpur and a committee member, told Reuters.

News English Title: Fifty percent Indians likely to have had infection by February 2021 projects government panel News updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x