25 November 2024 12:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

मोदींच्या भाषणाला थिल्लरपणा म्हणायचा की चिल्लरपणा | आ. मिटकरींचा टोला

NCP MLA Amol Mitkari, BJP leader Devendra Fadanvis, PM Narendra Modi

मुंबई, २१ ऑक्टोबर:देशावर ओढवलेल्या संकटाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (२० ऑक्टोबर) देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशातील परिस्थितीविषयी भाष्य केलं. मोदी यांनी देशातील करोना रुग्णसंख्या व अमेरिका, ब्राझील या देशातील परिस्थितीविषयी तुलनात्मक माहिती दिली. या वेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी लोकांकडून दुर्लक्ष होत असलेल्या एका गोष्टीवर चिंता व्यक्त केली होती. मात्र मोदींच्या भाषणानंतर विरोधकांनी निशाणा साधला आहे.

“मोदींच्या भाषणाला थिल्लरपणा म्हणायचा की चिल्लरपणा ??”, असा बोचरा सवाल राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा थेट उल्लेख करत अमोल मिटकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज (२० ऑक्टोबर) देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी, पंतप्रधान नेमके काय बोलणार ? कोणती मोठी महत्त्वाची घोषणा करणार ? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते. दरम्यान, पंतप्रधानांच्या याच संबोधनानंतर अमोल मिटकरींनी भाजपवर निशाणा साधला आहे.

अमोल मिटकरी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात कि, “मोदींच्या भाषणाला थिल्लरपणा म्हणायचा की चिल्लरपणा ?? बिहार बद्दल प्रेम उतू येणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी याचे उत्तर द्यावे. केंद्र सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अनाथ बाबत शांत का मोदी जबाब दो.” दरम्यान, काल (१९ ऑक्टोबर) देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अशीच टीका केली होती. “मुख्यमंत्र्यांना अशी थिल्लरबाजी करणं शोभत नाही. मोदीजी थेट लडाखला जातात. तिथे कोणीच जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी उगाच कोणाशी तुलना करु नये.”, असे फडणवीस म्हणाले होते.

 

News English Summary: Amol Mitkari has directly targeted the state’s opposition leader Devendra Fadnavis through Twitter. Prime Minister Modi today (October 20) interacted with the people of the country. This time, what exactly will the Prime Minister say? What will be the big announcement? It had the attention of the whole country. Meanwhile, Amol Mitkari has targeted the BJP after the Prime Minister’s address.

News English Title: NCP MLA Amol Mitkari criticizes BJP Devendra Fadanvis after PM Narendra Modi speech News updates.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x