6 November 2024 8:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

VIDEO | विद्यमान मुख्यमंत्र्यांची ती मागणी | मनसेकडून लाव रे तो व्हिडीओ

CM Uddhav Thackeray, Bala Nandgaonkar

मुंबई, २१ ऑक्टोबर: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काल उस्मानाबादच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत नसताना प्रती हेक्टर २५ हजारांची मदत करण्याची मागणी केली होती यासंबंधीचा व्हिडीओ दाखवला होता. मुख्यमंत्र्यांकडे आपली मागणी पूर्ण करण्याची ही चांगली संधी आहे असा टोला यावेळी त्यांनी लगावला होता.

आता मनसेने सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष करत लाव रे तो व्हिडिओ सुरु केलं आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ पोस्ट करून शेतकऱ्यांना मदत करा अशी विनंती केली आहे. या व्हिडीओत सत्तेत येण्यापूर्वी उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर भेटीगाठी करताना दिसत होते, त्यावेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. तेव्हा उद्धव ठाकरेंनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २५ हजारांची मदत करा अशी मागणी केली होती, शेतकऱ्यांना दिलासा देताना त्यांनी कागदी घोडे नाचवण्याआधी शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी आग्रही मागणी केली होती.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय की, मुख्यमंत्र्यांनी जनभावना लक्षात घेऊन बांधावरची स्थिती बघितल्याबद्दल तुमचे आभार. सोबत तुमचाच १ व्हिडीओ पोस्ट करीत आहे. तुम्ही स्वतः च मागणी केल्याप्रमाणे सरसकट २५ हजार हेक्टरी द्यावे व स्वतःच केलेली मागणी पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असं त्यांनी सांगितलं आहे.

 

News English Summary: MNS has also started the video by paying attention to Chief Minister Uddhav Thackeray. MNS leader Bala Nandgaonkar has posted an old video of Uddhav Thackeray and requested him to help the farmers. In this video, Uddhav Thackeray was seen meeting the farmers on the dam before he came to power. The unseasonal rains at that time caused huge losses to the farmers.

News English Title: MNS recalls CM Uddhav Thackeray old speech about give Farmers 25 thousand per hector News updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x