भाजपमधून राष्ट्रवादीत गेल्यानंतर खडसेंनी नैतिकतेच्या गोष्टी करु नयेत - प्रवीण दरेकर
मुंबई, २२ ऑक्टोबर : नेते ज्येष्ठ एकनाथ खडसे यांनी बुधवारी भाजपाचा राजीनामा दिला आहे. आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराबाबच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
एकनाथ खडसे उद्या (दि.२३) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. त्यासाठी गुरुवारी एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर येथून हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे सुद्धा आहेत. याशिवाय, एकनाथ खडसे यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी जळगावमधून वाहनाने अनेक कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले आहेत.
दरम्यान खडसेंनी भाजपचे आमदार संपर्कात असल्याचे वक्तव्य केले होते. त्याला विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “एकही भाजपचा आमदार नेते एकनाथ खडसे यांच्या संपर्कात नाही. कालपर्यंत ते पक्षात होते, म्हणून आमदार संपर्कात होते. भाजप पक्षाचे भविष्य सर्वांना माहित आहे. जिर्घकाळ नेतृत्व करणारा इतका मोठा पक्ष असताना केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीस काम कसे करत आहेत हे सगळ्यांना माहित आहे”.
“तसेच, पहाटेच्या शपथविधी बाबत नैतिकता आणि राष्ट्रवादीत गेल्यानंतर अनैतिकता त्यामुळे खडसेंनी नैतिकतेच्या गोष्टी करु नयेत. फडणवीसांवर जे डाग लावले त्याबद्दल आम्ही भोगले आहे. तर शरद पवार खडसेंना तोडपाणी करणारा नेता असे म्हणाले होते आणि आता त्याच पक्षात गेले आहात ना. आणि नांदा सौख्य भरे, असे म्हणत दरेकरांनी एकनाथ खडसेंना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत टोलाही लगावला.
News English Summary: Eknath Khadse had said that he was in touch with BJP MLAs. Opposition leader Praveen Darekar has replied to him. No BJP MLA is in touch with Eknath Khadse. Till yesterday he was in the party, so the MLAs were in touch. Everyone knows the future of the BJP. With such a large party leading for a long time, everyone knows how Modi is doing at the Center and Fadnavis at the state level.
News English Title: BJP MLA Pravin Darekar to Eknath Khadse News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार