25 November 2024 6:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

बिहार | मोदींच्या भाषणात मतांसाठी पुन्हा गलवान खोऱ्यातील शहीद जवानांचा वापर

Bihar Assembly Election 2020, PM Narendra Modi, Galwan Valley, Pulwama martyrs

सासाराम, २३ ऑक्टोबर: पंतप्रधान मोदी यांची आज बिहार निवडणुकीसाठी पहिली सभा होत आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घातला. पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांवर विरोधकांना लक्ष्य केलं. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 एनडीए सरकारने हटवलं. पण विरोधकांना या निर्णय उलटवायचा आहे. अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली आहे.

पीएम नरेंद्र मोदींनी म्हटलं की, ‘आमच्या सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला. पण आता हे लोकं याला उलटवण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधक म्हणतायंत की, सत्तेत आल्यानंतर ते पुन्हा कलम 370 लागू करतील. यांनी कोणाचीही मदत घेतली तरी देश मागे हटणार नाही.’

गलवान खोऱ्यात बिहारचे जवान शहीद झाले. मात्र त्यांनी भारतमातेची मान झुकू दिली नाही, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही बिहारच्या जवानांनी बलिदान दिलं. त्यांनी मी शतश: वंदन करतो, असं मोदी पुढे म्हणाले. यावेळी मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. केंद्रात काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार असताना बिहार मागे पडला . बिहारची १० वर्षे वाया गेली, अशा शब्दांत पंतप्रधानांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

 

News English Summary: Bihar jawans were martyred in Galwan valley. However, he did not bow down to Mother India, saying that Prime Minister Narendra Modi started his election campaign in Bihar. Bihar soldiers also sacrificed their lives in the terrorist attack in Pulwama. I salute them, Modi further said. This time, Modi strongly criticized the opposition.

News English Title: Bihar Assembly Election 2020 Sons of Bihar lost their lives for Tricolour PM Modi pays tributes to Galwan Valley, Pulwama martyrs News updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x