22 November 2024 6:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

निवडणुकीत शेतकरी, जवानांसमोर नतमस्तक होतात | घरी गेल्यावर अंबानी-अदानीचं काम करतात

Bihar Assembly Election 2020, congress MP Rahul Gandhi, PM Narendra Modi, Farmers and Army Jawan

पाटणा, २३ ऑक्टोबर: पंतप्रधान मोदी यांची आज बिहार निवडणुकीसाठी पहिली सभा होत आहे. पंतप्रधान मोदी यांची पहिली रॅली आज सासाराम येथे झाली. या रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबासह महाआघाडीवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी यांनी कलम ३७० वरून विरोधकांवर हल्लाबोल केला.

गलवान खोऱ्यात बिहारचे जवान शहीद झाले. मात्र त्यांनी भारतमातेची मान झुकू दिली नाही, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही बिहारच्या जवानांनी बलिदान दिलं. त्यांनी मी शतश: वंदन करतो, असं मोदी पुढे म्हणाले. यावेळी मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. केंद्रात काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार असताना बिहार मागे पडला . बिहारची १० वर्षे वाया गेली, अशा शब्दांत पंतप्रधानांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

दरम्यान, पंतप्रधानांनी महाआघाडीवर टीकास्त्र डागल्यानंतर राहुल गांधी यांनी प्रचाराच्या मैदानातून मोदींवर पलटवार केला. राहुल गांधी यांनी चीन सीमावाद व रोजगाराच्या मुद्यावरून मोदींना सवाल करत बिहारच्या जनतेला सत्तांतराचं आवाहन केलं.

राहुल गांधी व तेजस्वी यादव यांची संयुक्त बदलाव संकल्प रॅली नवादा जिल्ह्यातील हिसुआमध्ये झाली. या रॅलीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर खोटं बोलत असल्याचा आरोप केला. “प्रश्न हा आहे की, चीनच्या जवानांनी आपल्याला जवानांना शहीद करून १२०० किमी जमीन चीननं घेतली. चिनी सैन्य भारतात आहे. चीन भारतीय हद्दीत घुसले होते, तेव्हा मोदी असं का म्हणाले होते की, भारतात कुणीही घुसखोरी केली नाही. आज म्हणतात नतमस्तक होतो. पण, खोटं बोलून त्यांनी शहिदांचा अपमान केला. आता प्रश्न आहे की, चीनला परत कधी हद्दपार करणार. आणि येथे येऊन काहीही खोटं बोलू नका. बिहारींना खोटं बोलू नका. तुम्ही सांगा किती बिहारींना रोजगार दिली. मागील निवडणुकीत म्हणाले होते २ कोटी तरुणांना रोजगार देणार. कुणाला मिळाला का? येतात आणि म्हणतात, शेतकरी, जवान आणि मजुरांच्या समोर मी नतमस्तक होतो. घरी गेल्यावर अंबानी व अदानीचं काम करतात.

 

News English Summary: The joint change resolution rally of Rahul Gandhi and Tejaswi Yadav took place in Hisua in Nawada district. At the rally, Rahul Gandhi accused Prime Minister Modi of lying. In the last election, it was said that it will provide employment to 2 crore youth. Did anyone get it? Come and say, I bow before farmers, soldiers and laborers. When he goes home, he works for Ambani and Adani.

News English Title: Bihar Assembly Election 2020 congress MP Rahul Gandhi criticized PM Narendra Modi over Farmers and Army Jawan issue News updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x