22 April 2025 1:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | एक दिवसात 12 टक्क्यांनी वाढला पेनी स्टॉक, स्टॉक खरेदीला गर्दी, फायदा घ्या - NSE: RTNPOWER Tata Technologies Share Price | का तुटून पडत आहेत गुंतवणूकदार टाटा टेक शेअर्सवर? संधी सोडू नका - NSE: TATATECH Trident Share Price | पेनी स्टॉकने अप्पर सर्किट हिट केला, यापूर्वी 5676% रिटर्न दिला, श्रीमंत करू शकतो हा स्टॉक - NSE: TRIDENT
x

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना १० हजार कोटींची मदत | मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा

CM Uddhav Thackeray, Announces package, Farmers affected

मुंबई, २३ ऑक्टोबर: राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पिक वाहून गेले आहे. या अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या आर्थिक मदतेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, हे १०,००० कोटी रुपये विविध कारणआंसाठी असणार आहेत. शेतीचे झालेले नुकसान, वाहून गेलेली शेती, खरडून गेलेली शेती, पिकं वाहून गेली असतील, रस्ते उद्धवस्त झाले असतील, विजेचे खांब पडले असतील, दळणवळण यंत्रणा असेल या सर्व गोष्टींसाठी दहा हजार कोटी आम्ही जाहीर करत आहोत.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, सर्वांचा विचार केल्यानंतर आम्ही आढआवा घेतला. या आपत्तीच्या निमित्ताने आम्ही शेतकऱ्यांना शब्द दिला होता की, आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. म्हणून या सगळ्याचा विचार करुन १०,००० कोटी रुपये देण्याचं आम्ही निश्चित केलं आहे. तसेच दिवाळीपूर्वी सर्वांपर्यंत मदत पोहोचवणार असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

अद्यापपर्यंत पूर, अतिवृष्टीसंदर्भात केंद्राचं पथक पाहणीसाठी आलेलं नाही. आम्ही दोन तीनदा विनंती केली आहे. मात्र केंद्राकडून प्रतिसाद मिळालेली नाही. मात्र बळीराजाला मदत करणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही १० हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करत आहोत. यात रस्त्यांची दुरुस्ती, शेतजमिनीची दुरुस्ती व इतर नुकसान भरपाईचा समावेश आहे. दिवाळीपर्यंत ही मदत दिली जाईल. जीएसटीचे पैसे थकल्यानं पैशांची ओढाताण आहे. पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा आमचा शब्द आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

जिरायत, बागायत जमिनीसाठी ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे. त्यामुळे आम्ही ती प्रति हेक्टरी १० हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार आहोत. फळपिकांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर ऐवजी २५ हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

पूर व अतिवृष्टीग्रस्त ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात आज वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री ॲड अनिल परब उपस्थित होते.

कसं असणार १० हजार कोटींचं पॅकेज:

  • कृषी, शेती घरासाठी- ५५०० कोटी
  • रस्ते पूल- २६३५ कोटी
  • ग्रामीण रस्ते आणि पाणीपुरवठा- १००० कोटी
  • नगर विकास- ३०० कोटी
  • महावितरण उर्जा- २३९ कोटी
  • जलसंपदा- १०२ कोटी

 

News English Summary: The Uddhav Thackeray-led government in Maharashtra government on Friday announced a relief package of Rs 10,000 crore for the rain-affected parts of the state, saying the amount will be disbursed before Diwali. The announcement from the chief minister’s office came days after Thackeray took a review of the estimated losses to crops, livestock, structure in the areas which were hit hard by the rains.

News English Title: CM Uddhav Thackeray announces package of 10000 crore to farmers affected by heavy rains News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या