22 November 2024 5:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Mega Bharti | महापारेषणमध्ये लवकरच 8,500 जागांची मेगाभरती

MAHADISCOM Recruitment 2020, Mahapareshan Recruitment 2020, free job alert

मुंबई, २४ ऑक्टोबर : पोलीस भरती नंतर आता, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महापारेषण कंपनीत तब्बल 8,500 जागांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे, नोकर भरतीकडे डोळे लावून बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

महापारेषणमध्ये तांत्रिक श्रेणीतील 8 हजार 500 पदांची ही भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. तांत्रिक संवर्गातील 6750 पदे व अभियंता संवर्गातील 1762 पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहे. महापारेषण कंपनीतील ही रिक्त पदे भरण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी शुक्रवारी दिले आहेत. त्यामुळे राज्यात मेगा-भरतीचा मार्ग आता मोकळा झाल्याचे दिसून येत आहे. नव्याने होणाऱ्या या पदभरतीत आय.टी.आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय अभियांत्रिकी पदवीधारकांनाही नोकरीची संधी या भरतीद्वारे निर्माण होणार आहे.

आयटीआय उत्तीर्ण तरुणांना या भरती प्रक्रियेमुळे सरकारी विभागात नोकरीची मोठी संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे, तरुणांनी भरती प्रक्रियेच्या तारखा आणि परीक्षेच्या अभ्यावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईसह उपनगरातील बत्ती गुल झाली होती. याचा फटका रेल्वेलाही बसला होता. आता यापुढे मुंबईतील वीज ठप्प होऊ नये म्हणून रायगड जिल्ह्यातील उरण येथे हजार मेगा वाट क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी याबाबत निर्देश दिले आहेत.

मुंबईतील वीज पूरवठा १२ ऑक्टोबर रोजी ठप्प झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वीज निर्मिती क्षमता वाढविण्यासाठी उरण येथील वायू विद्युत निर्मिती केंद्राची क्षमता वाढविण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिले आहेत. यासाठी उरण येथेच विद्यमान प्रकल्पातील रिक्त जागेवर नवा किमान एक हजार मेगावाट क्षमतेचा वायू विद्युत निर्मिती केंद्र येत्या दोन वर्षांत उभे करण्याच्या सूचना मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या आहेत.

 

News English Summary: The recruitment process for 8,500 technical posts in Mahatrans will start soon. Mahatransport Management is preparing for mega recruitment of 6750 posts in Technical category and 1762 posts in Engineer category. The order to fill these vacancies in the Mahatransport Company was given by the Minister of State for Energy, Dr. Raut said on Friday. Therefore, the path of mega-recruitment in the state is now open.

News English Title: MahaTransco Recruitment 2020 free job alert notification news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(473)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x