TRP Scam | बोगस कंपन्यांमार्फत आर्थिक उलाढाल | अजून एकाला अटक
मुंबई, २४ ऑक्टोबर : टीआरपी घोटाळ्यात (TRP Scam Case) दिवसागणिक नवनवीन प्रकार समोर येत असून या प्रकरणात संशयित असलेल्या वाहिन्यांनी आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या आरोपींनी आर्थिक व्यवहारासाठी बोगस कंपन्या थाटल्या होत्या असे तपासातून उघड झाले आहे. आर्थिक व्यवहाराचे काही पुरावे मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहेत. गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने गुरुवारी रात्री पवई येथून हरिष पाटील (४५) या व्यक्तीला अटक के ली. पाटीलच्या नावे सात कंपन्यांची नोंद आह.
मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेचे विशेष पथक (Mumbai Police Crime Branch) नेमले असून आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत. यातील एका पथकाने गुरूवारी हरिष पाटील याला अटक केली. पाटीलच्या नावे सात कंपन्यांची नोंद असून त्यापैकी कॅप्स लॉक डीजीटल सोल्यूशन नावाच्या कंपनीद्वारे एका संशयीत वाहिनीचे आर्थिक व्यवहार समोर आले आहेत. पथकाने प्रत्यक्ष शहानिशा केली असता दिलेल्या पत्त्यावर अशी कोणतीही कंपनी आढळली नाही. या कंपनीचे देशभरात १४२२ वेण्डर असून पाटील त्यापैकी एक आहे. पाटील याच्या अटकेने या घोटाळ्यातील अटक आरोपींची संख्या ९ वर पोहचली आहे. रिपब्लीक वाहिनीचे सीएफओ शीवा सुंदरम अणि वितरण विभागाचे प्रमुख घनश्याम सिंग यांची शुक्रवारी तिसऱ्यांदा चौकशी करण्यात आली.
तत्पूर्वी, आर्थिक व्यवहारांचा तपास करण्यासाठी न्यायवैद्यक पर्यवेक्षक (फॉरेन्सिक ऑडिटर) नेमण्याचा निर्णय घेतल्याचे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले होते. आतापर्यंतच्या तपासात टीआरपी घोटाळयात सहभागी असलेल्या फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्ही यांच्या बँक खात्यांवरून कोटय़वधींचे व्यवहार घडले आहेत. या व्यवहारांची गुंतागुंत उलगडण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिटरची मदत होईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले होते. त्या तपासासाठीच फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा यांची खाती गोठवण्यात आल्याचेही गुन्हे शाखेने स्पष्ट केले होते. विशेष पथकाने सोमवारी हंसा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण निझाम यांचा जबाब तर उपव्यवस्थापक नितीन देवकर यांचा पुरवणी जबाब नोंदवला होता.
News English Summary: The TRP scam is emerging day by day and the investigation has revealed that the channels suspected in the case and the accused working for them had set up bogus companies for financial transactions. Mumbai police have found some evidence of financial transactions. A special squad of Crime Branch arrested Harish Patil (45) from Powai on Thursday night. There are seven companies registered in Patil’s name.
News English Title: One more accused arrested by Mumbai Police crime branch in TRP scam case News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार