23 April 2025 3:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | शेअर असावा तर असा, तब्बल 1,33,786 टक्के परतावा, संयम पळणारे श्रीमंत झाले - NSE: BEL Bonus Share News | अशी संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: UEL Horoscope Today | 23 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | आयआरबी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB Reliance Power Share Price | शेअर प्राईस 43 रुपये; रिलायन्स पॉवर शेअर्सबाबत फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Apollo Micro Systems Share Price | तगडा परतावा मिळेल, हा डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार - NSE: APOLLO Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 23 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

भारताचा कोरोना रिकव्हरी रेट ८९.७ टक्के | लसीचे प्रयोग प्रगतीपथावर

India, Corona recovery rate, growing positively

नवी दिल्ली, २४ ऑक्टोबर : भारत (India) झपाट्याने कोरोनामुक्त देश होत आहे. देशाचा कोरोना रिकव्हरी रेट ८९.७ टक्के तर डेथ रेट (मृत्यू दर) १.५१ टक्के आहे. भारतात ताज्या आकडेवारीनुसार ६ लाख ८० हजार ६४४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत ७८ लाख १४ हजार ६८२ जणांना कोरोनाची लागण झाली. यापैकी ७० लाख १६ हजार ४६ जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे देशात १ लाख १७ हजार ९९२ जणांचा मृत्यू झाला.

भारतात सणासमुदीच्या दिवसांमुळे पुढील दिड महिन्यात नागरिक बाहेर पडण्याची आणि भेटीगाठीच्या निमित्ताने एकत्र येण्याची शक्यता जास्त आहे. भारतासाठी हा कालावधी महत्त्वाचा आहे. या कालावधीत कोरोना संकट वाढले नाही तर देशातली महामारीची समस्या लवकरच आटोक्यात येईल. सध्या भारतामध्ये कोरोनाच्या वेगवेगळ्या लसींसाठी प्रयोग सुरू आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी भारतीय लस २०२१च्या पहिल्या तिमाहीत तयार होईल, असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केला.

भारत बायोटेक आणि सीरमसह देशातील सात कंपन्या कोरोनावर मात करण्यासाठी लस करण्याकरिता संशोधन करत आहेत. प्रत्येक संस्थेचे संशोधन वेगवेगळ्या टप्प्यावर असले तरी प्रगतीपथावर आहे. भारतात कोरोना रिकव्हरी रेट वाढत असताना लस आल्यास संकटावर मात करणे आणखी सोपे होईल, अशी आशा आहे. ताज्या अहवालानुसार सीरम आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांचे प्रयोग यशस्वी झाल्यास या दोन्ही कंपन्या २०२१च्या पहिल्या तिमाहीत लस बाजारात आणण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा विळखा जनगभरात वाढत आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण अजूनही 50 हजारहून अधिक दर दिवसाला वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाची लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी सर्वजण प्रतीक्षा करत आहेत. ऑक्सफोर्ड आणि सीरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेल्या लशीची चाचणी देखील सध्या तिसऱ्या टप्प्यात सुरू आहे.

हैदराबादस्थित असलेल्या या कंपनीने 2 ऑक्टोबर रोजी DCGI कडे तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर या कंपनीला परवानगी देण्यात आली आहे. 12 ते 14 राज्यातील 20 हजारहून अधिक नागरिकांवर या लशीची चाचणी होणार आहे. मार्च अखेरपर्यंत या लशीचे सर्व परिणामांची माहिती मिळू शकते त्यामुळे जूनपर्यंत ही लस उपलब्ध करून देता येऊ शकते असं भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक साई प्रसाद यांनी दावा केला आहे.

 

News English Summary: India is rapidly becoming a corona-free country. The country’s corona recovery rate is 89.7 per cent and death rate is 1.51 per cent. According to the latest statistics, there are 6 lakh 80 thousand 644 corona active patients in India. So far, 78 lakh 14 thousand 682 people have been infected with corona in the country. Of these, 70 lakh 16 thousand 46 people were released from coronation. Corona killed 1 lakh 17 thousand 992 people in the country.

News English Title: Indias corona recovery rate growing positively News Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या