24 November 2024 5:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Tulsi Leaves Milk Health Benefits | तुळशी मिल्क | पाच रोगांना दूर ठेवणारा आयुर्वेदिक उपाय

Tulsi leaves milk health benefits

मुंबई, २५ ऑक्टोबर: तुळशीच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, यामुळे तुळशीला आयुर्वेदात (Tulsi leaves milk health benefits) खूप महत्त्व आहे. तुळशीच्या पानांचे सेवन केल्यानंतर अनेक विकार दूर होतात. सध्या जगात कोरोना नावाचा आजार पसरला आहे. हा आजार आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी करत असतो, यामुळे सरकारकडून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास भर दिला आहे. तुळशीच्या पाने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. यामुळे तुळशीची पाने आपण सेवन केली पाहिजे. परंतु तुम्हाला माहिती आहे का? जर तुळशीची पाने दुधात टाकून दूध गरम केले आणि ते पिले तर आपण अनेक विकारातून मुक्त होऊ शकतो. चला तर मग तुळशी दूध म्हणजेच तुळशी मिल्क बनवण्याची पद्धत आणि याचे सेवन करण्याची वेळ याची माहिती घेऊया.

Tulsi leaves milk health benefits. Tulsi leaves have many medicinal properties, which is why Tulsi is very important in Ayurveda. Many ailments go away after consuming Tulsi leaves. Currently, there is a disease called corona in the world :

कसे कराल सेवन:
तुळशी मिल्क बनवण्यासाठी दीड ग्लास दूध गरम करावे. दूध गरम करताना त्यात ८ ते १० तुळशीची पाने टाकावीत. गरम करताना दूध थोडं अटू द्यावे, एक ग्लास दूध राहिले असेल तर गॅस बंद करावा. दूध थोडं गार झाल्यानंतर घ्यावे. नियमित तुळशी मिल्क घेतल्यानंतरच तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.

कोणते विकार होतात दूर:

मायग्रेन पासून होते मुक्ती:
दुधात तुळशीची पाने टाकून पिल्यानंतर डोके दुखी आणि मायग्रेन सारखी समस्या दूर होते. जर आपणास मायग्रेनचा त्रास बऱ्याच दिवसांपासून असेल तर आपण दररोज तुळशी मिल्कचे सेवन करावे.

तणावापासून होते मुक्ती:
जर आपण ऑफिसचे टेन्शन किंवा कुटुंबातील वादामुळे तणावात राहत असाल तर तुळशी मिल्क आपल्याला यातून सुटका देणार आहे. तुळशीच्या पानात हिलिंगचे गुण असतात. दुधात तुळशीचे पाने टाकून त्याचे सेवन केल्यास तणावही दूर होतो.

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत:
सध्या कोरोनासारख्या आजाराची साथ चालू आहे. कोरोना आपल्या शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी करत असतो. अशात आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याची गरज असते आणि ते मिळते तुळशी मिल्क मधून. तुळशीच्या पानात एंटीऑक्सीडेंट्स हे गुण असतात हे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करतात. यासह तुळशीमध्ये एंटीबॅक्टेरिअल आणि एंटीवायरल हे गुण असल्याने सर्दी, खोकला, तापही दूर होत असतो.

हृदयाची घेते काळजी:
दुधात तुळशीचे पाने टाकून दूध गरम केल्याने आपले हृदय पण निरोगी राहते. रोज रिकाम्या पोटी तुळशी मिल्क पिल्याने हृदय रोग्यांना फायदा होत असतो.

दमाच्या विकारापासून ठेवते दूर:
जर आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तुळशी मिल्क घ्यावे. या आजारापासूनही तुळशी मिल्क आपली सुटका करेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Tulsi leaves milk health benefits in Marathi.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x