मुंबई महापालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार - संजय राऊत
मुंबई, २५ ऑक्टोबर: करोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये न होता सभागृहात होणार आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याबाबत सगळीकडेच चर्चा आहे. तर, विरोधी पक्ष असलेला भाजपला लक्ष्य करणार का, असंही विचारलं जातं आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
राज्यात २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय गणिते बदलली असून भाजपच्याविरोधात महाविकास आघाडीच्या रूपाने महाराष्ट्रात विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. साहजिकच यंदाच्या दसरा मेळाव्यात ज्याचा खरपूस समाचार घ्यायचा, असा भाजप हा एकमेव विरोधी पक्ष असणार आहे. त्यामुळं मुख्यमंत्री काय भूमिका घेणार याची उत्सुकता असतानाच संजय राऊत यांनी टार्गेट करणारं राजकारण शिवसेना कधीच करत नाही, असा खोचक टोला लगावला आहे.
दसरा मेळाव्यासंदर्भात बोलताना, आगामी महापालिका निवडणुकांवरही संजय राऊत यांनी भाष्य केलंय. आगामी महापालिका निवडणुकाही महाविकास आघाडीच्याच नेतृत्वात लढल्या जातील. महापालिकेत पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेतृत्वात सत्ता येईल, असे भाकीत खासदार राऊत यांनी केलंय. अनेकजण म्हटले होते की, 11 दिवसांत सरकार पडेल. गणपतीला सरकारचे विसर्जन होईल, पण आता दसरा आला आहे. आमच्याकडे सर्व तयारी झाली आहे, आता त्यांच्याच खाली बॉम्ब फुटतील, असे म्हणत भाजपाला इशारा दिला. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकांमध्येही महाविकास आघाडी एकत्र असेल, असे भाकीत राऊत यांनी केलंय.
News English Summary: Sanjay Raut has also commented on the upcoming municipal elections. The upcoming municipal elections will also be fought under the leadership of Mahavikas Aghadi. MP Raut has predicted that Shiv Sena will once again come to power in the Municipal Corporation. Many had said that the government would fall in 11 days. Ganpati will be immersed in the government, but now Dussehra has come.
News English Title: Mahavikas Aghadi will contest Mumbai Municipal Corporation elections together said MP Sanjay Raut News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार