22 November 2024 2:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

रोहित पवारांनी सावरली फडणवीसांची बाजू | नेटकाऱ्याला म्हणाले असं बोलणं योग्य नव्हे

NCP MLA Rohit Pawar, Devendra Fadnavis, coronavirus infection

मुंबई, २६ ऑक्टोबर : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि बिहार विधानसभा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना करोना झाल्याचं निदान झालं होतं. फडणवीस यांनी ट्विट करून याची माहिती दिली होती. गेल्या काही दिवसांपासून फडणवीस हे महाराष्ट्र व बिहार असा दोन्ही ठिकाणी फिरतीवर होते. बिहारमध्ये प्रचारामुळे ते सातत्यानं दौऱ्यावर होते. तर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्यानं त्यांनी पाहणी केली होती.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करुन सांगितले होतं की लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, असा संकेत दिसतो. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे असं त्यांनी सांगितलं होतं.

त्यानंतर एका नेटकऱ्यानं फडणवीस बिहारच्या निकालामुळे नाटक करत असल्याचं ट्विट केलं होतं. त्यात त्याने म्हटले आहे की, ‘कोरोना वगैरे काही नाही, बिहार मध्ये बीजेपी १००% हरणार आहे हे त्यांना स्पष्ट दिसतंय आणि त्याचं खापर आपल्यावर फुटु नये म्हणून हे कोरोनाचं नाटक… बाकी काही नाही दादा’.

त्यावरून आमदार रोहित पवार यांनी त्याला सुनावलं आहे. “देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडं जबाबदार पद आहे आणि आरोग्याच्या बाबतीत कुणी खोटं बोलत नसतं. त्यामुळं त्यांच्याबाबत असं बोलणं योग्य नाही, त्यांचा आपण सन्मान ठेवलाच पाहिजे. दुसरा मुद्दा मात्र खरा आहे. बिहारमध्ये भाजप हरणार असं अनेकजण बोलतायेत आणि अनेकजण ते कबूलही करतायेत,” असं रोहित पवार म्हणाले.

 

News English Summary: Devendraji Fadnavis has a responsible position and no one is lying about health. Therefore, it is not right to talk about them like that, we must respect them. The second point, however, is true. In Bihar, many people say that BJP will lose and many people even admit it, ”said Rohit Pawar.

News English Title: NCP MLA Rohit Pawar reply his supporter about Devendra Fadnavis coronavirus infection News Updates.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x