18 April 2025 1:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | 10 रुपयाचा पेनी स्टॉक देईल मोठा परतावा, यापूर्वी दिला 627% परतावा - NSE: RTNPOWER BHEL Share Price | अशी संधी सोडू नका, मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, टार्गेट जाणून घ्या - NSE: BHEL IRB Share Price | संधी सोडू नका, आयआरबी इन्फ्रा शेअर देणार एवढा परतावा, यापूर्वी 502% रिटर्न दिला - NSE: IRB Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

सरकार कधी पडेल हे उद्धव ठाकरेंना कळणारही नाही | आठवलेंचं वक्तव्य

Union minister Ramdas Athavale, CM Uddhav Thackeray

मुंबई, २६ ऑक्टोबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कालच्या (२५ ऑक्टोबर) दसरा मेळाव्यात तुफान फटकेबाजी केली. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी भाजपसहित, कंगना रानौत आणि राणे कुटुंबीयांचा खरपूस समाचार घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे हे सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘बेडूक’ असा उल्लेख करत निशाणा साधला. तर हिम्मत असेल तर राज्य सरकार पाडून दाखवा असं आव्हान देखील दिलं होतं.

दरम्यान, सरकार आम्ही पाडणार नाही पण हे सरकार कधी पडणार हे उद्धव ठाकरे यांना कळणारही नाही असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. सरकार पडलं तर अराजकता पसरेल असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केले होते. या मताशी मी सहमत नसल्याचे आठवले म्हणाले. भाजप शिवसेना २५-३० वर्ष एकत्र हिंदुत्वावर होते. संघाकडून हिंदुत्व शिकण्याची गरज नाही संघात सगळे तयार झाले आहेत असे आठवले म्हणाले. भाजपवर टीका करताना शिवसेनेचे हिंदुत्व वेगळे कसे ? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय.

जीएसटी कायदा रद्द करण्याची गरज नाही. यात नवीन काही करण्याची गरज नाही. जीएसटी पैसा मिळाला पाहिजे या उद्धव ठाकरे यांच्या मताशी सहमत असून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आठवले म्हणाले. सरकार पडेल इतिहास घडेल. महाविकास आघाडी सरकार आम्ही पाडणार नाही. हे सरकार स्वतः पडणार असे ते म्हणाले. सरकार खुद गीर जायेगे, महाविकास आघाडी हार जायेगी अशा शब्दात त्यांनी हे स्पष्टीकरण केलं.

 

News English Summary: Meanwhile, Union Minister Ramdas Athavale has said that we will not overthrow the government but Uddhav Thackeray will not know when this government will fall. Chief Minister Uddhav Thackeray had said at the Dussehra rally that if the government falls, chaos will spread. Athavale said he did not agree with this opinion. BJP Shiv Sena was on Hindutva together for 25-30 years. He said that there is no need to learn Hindutva from the Sangh. How is Shiv Sena’s Hindutva different when criticizing BJP? He also raised such a question.

News English Title: Union minister Ramdas Athavale political attacked on CM Uddhav Thackeray News Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ramdas Athawale(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या