भाषणात नवीन काहीच नव्हतं | केवळ जळफळाट | भाजपची दहशत पाहायला मिळाली
मुंबई, २६ ऑक्टोबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कालच्या (२५ ऑक्टोबर) दसरा मेळाव्यात तुफान फटकेबाजी केली. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांचा खरपूस समाचार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे हे सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘बेडूक’ असा उल्लेख करत भाजपवर देखील तिखट शब्दात निशाणा साधला होता.
दरम्यान, भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर तिखट शब्दात टीका केली आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणात नवीन काहीच नव्हतं. या भाषणात केवळ जळफळाट आणि भाजपची दहशत पाहायला मिळाली. हे भाषण म्हणजे एक फ्लॉप शो होता, अशा शब्दांत भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले.
हिंदुत्व आम्हाला नाही तर तुम्हालाच शिकून घेण्याची गरज आहे. कारण तुमचं हिंदुत्व आता भेसळयुक्त झालं आहे, असा निशाणा शेलार यांनी साधला. घंटा वाजवा, थाळ्या बडवा हेच तुमचे हिंदुत्व आहे का?, असा सवाल उद्धव यांनी केला होता त्यावर टाळ्या आणि थाळ्यांचा हिंदुत्वाशी संबंध काय?, असा प्रतिसवाल शेलार यांनी केला. करोनाशी सुरू असलेल्या लढ्यात जे स्वयंसेवक काम करत आहेत त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी पंतप्रधानांनी ते आवाहन केले होते हे तुम्हाला भाषण लिहून देणाऱ्यांना बहुतेक माहीत नसावे, असा टोला शेलार यांनी लगावला. बाबरी पाडली तेव्हा कोण बिळात लपून बसले होते ते सगळ्यांना ठाऊक आहे, असा टोला उद्धव यांनी लगावला होता. त्यावर १९९२-९३ला तुम्ही कोणत्या बिळात होता ते आधी सांगा, असे आव्हान शेलार यांनी दिले.
दुसरीकडे खासदार नारायण राणे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं. उद्धव ठाकरे म्हणजे दिशाभूल करणारे, थापा मारणारे मुख्यमंत्री आहेत. मराठ्यांना आरक्षण हा माणूस कधीही देऊ शकत नाही कारण मराठ्यांचा द्वेष करणारा हा माणूस आहे असाही आरोप नारायण राणेंनी केला. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी या माणसाला कधीही मुख्यमंत्री केलं नसतं असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.
News English Summary: BJP MLA Ashish Shelar has sharply criticized Chief Minister Uddhav Thackeray. There was nothing new in the speeches of Chief Minister and Shiv Sena chief Uddhav Thackeray. The only thing that was seen in this speech was the panic of the BJP. This speech was a flop show, in the words of BJP MLA Adv. Ashish Shelar today responded to Uddhav Thackeray’s criticism.
News English Title: BJP MLA Ashish Shelar criticized CM Uddhav Thackeray after statement in Dasara Melava News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News