काल पंकजा मुंडेंशी मतभेद | आज भाजपा आ. सुरेश धस यांना पवारांसोबतच्या बैठकीत प्रवेश

बीड, २७ ऑक्टोबर: २१ रुपयांच्या पुढे दरवाढ मिळाली तर कोयता उचलून तोडणीला जाण्याचे पंकजा मुंडे (BJP Ex MLA and Minister Pankaja Munde) यांनी काल आदेश दिले होते. मात्र दुसरीकडे या घोषणेला विरोध करत भाजप आमदार सुरेश धस (BJP MLA Suresh Dhas) यांनी १५० टक्के वाढ झाल्याशिवाय एकही मजूर जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती. ऊसतोड मजुरांच्या आंदोलनात (Sugarcane worker) फूट पडल्याचं चित्र होतं. कारण या प्रश्नावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस आमने-सामने आल्याचं काल पाहायला मिळत होतं.
महाराष्ट्र राज्य श्रमिक संघटना, गोपीनाथ मुंडे ऊसतोड संघटना, तसंच माझ्यासहित ११ संघटनांच्यावतीने, मुकादमांचं कमिशन साडे १८ टक्क्कांवरुन ३७ टक्के करण्यात यावं, ऊसतोड मजुरांच्या मजुरीमध्ये १५० टक्के वाढ करण्यात यावी तसंच वाहतूकदरांची दरवाढ करुन ती दरवाढ ५० टक्के करण्यात यावी, अशी आमची मागणी असल्याचं सुरेश धस यांनी काल सांगितलं होतं. दरम्यान आम्हाला जोपर्यंत दरवाढ मिळत नाही तोपर्यंत ११ संघटनांचं आंदोलन सुरुच राहील, असा इशारा सुरेश धस यांनी दिलाय.
पुण्यात ऊस तोड मजुरांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वसंत दादा शुगर इन्स्टिटयूटमध्ये बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला भाजपचे नेते सुरेश धस यांना येता येणार नाही, असे सांगण्यात आले. त्या निर्णयामुळे धस आक्रमक झाले. त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन सुरु केले. या आंदोलनानंतर त्यांना बैठकीसाठी आत बोलवण्यात आले. “ज्यांनी मला बैठकीसाठी येऊ दिले नाही. तसेच आमच्या जिल्ह्यातील काही लोक आतमध्ये आहेत. त्यांना जाऊन विचारा” अशी भूमिका मांडत भाजपचे नेते सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना टोला लगावला. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मंत्री जयंत पाटील, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित आहेत.
News English Summary: In Pune, a meeting has been organized at Vasant Dada Sugar Institute under the chairmanship of NCP’s Sarvesarva Sharad Pawar on the issue of sugarcane workers. BJP leader Suresh Dhas will not be able to attend the meeting. That decision made Dhas aggressive. They started agitation at that place. After the agitation, they were called in for a meeting.
News English Title: After Protest BJP MLA Suresh Dhas Allowed To Enter Meeting On Sugarcane Workers News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK