22 November 2024 11:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

पेंग्विन आणि कंगनाच्या खटल्यासाठी मुंबईकर कर भरतात | आता काय शिल्लक आहे

BJP MLA Nitesh Rane, Shivsena, BMC Kangana Ranaut, Court Case Spent

मुंबई, २८ ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत विरुद्धच्या खटल्यासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत तब्बल 82 लाख 50 हजार रुपयांचा खर्च केला आहे. माहिती अधिकार कायद्यातंर्गत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरुन आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारवर टीका केली आहे.

“पेंग्विन आणि कंगनाच्या खटल्यासाठी मुंबईकर कर भरतात. आता काय शिल्लक आहे. आता यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील असं वाटत आहे,” असं म्हणत नितेश राणे यांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून या प्रकरणावर भाष्य करत टीका केली.

अभिनेत्री कंगना रानौतने वांद्रे पाली हिल येथील आपल्या घरात माणिकर्णिका फिल्म्सचे कार्यालय सुरु केले होते. या कार्यालयात कंगनाने बेकायदेशीर बांधकाम केले होते. याच दरम्यान कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. त्याचे मुंबईत याचे पडसाद उमटले होते. मुंबई महापालिकेने कंगनाला बेकायदेशीर बांधकाम केल्या प्रकरणी 354 कलमान्वये नोटीस दिली होती. या नोटीसीला योग्य उत्तर दिले नसल्याने पालिकेने कंगनाच्या मणिकर्णिका फिल्म्स या कार्यालयातील बेकायदेशीर बांधकाम तोडले होते.

या प्रकरणी कंगनाने न्यायालयात धाव घेत दाद मागितली आहे. या प्रकरणी पालिकेच्या बाजूने ज्येष्ठ वकील, वरिष्ठ अधिवक्ता अस्पी चिनॉय न्यायालयात बाजू मांडत आहेत. या न्यायालयीन लढाईसाठी पालिकेला आतापर्यंत ८२ लाख ५० हजार रुपये खर्च आला आहे. आतापर्यंत या प्रकरणी अस्पी चिनॉय यांनी ११ वेळा न्यायालयात पालिकेची बाजू मांडली. प्रत्येक तारखेसाठी सात लाख ५० हजार रुपये याप्रमाणे पालिकेला ८२ लाख ५० रुपये खर्च आला आहे. शरद यादव यांनी पालिकेच्या विधि खात्याकडे ‘माहितीचा अधिकार कायद्या’अंतर्गत अर्ज करून कंगना राणौत विरुद्ध महापालिका प्रकरणात अस्पी चिनॉय यांना देण्यात आलेल्या शुल्काबाबतची माहिती मागितली होती. विधि खात्याने दिलेल्या माहितीच्या आधारे ही बाब उघड झाली आहे.

 

News English Summary: Mumbai Municipal Corporation has so far spent Rs 82 lakh 50 thousand for the lawsuit against Bollywood actress Kangana Ranaut. This shocking information has come to light under the Right to Information Act. MLA Nitesh Rane has criticized the government of Chief Minister Uddhav Thackeray.

News English Title: BJP MLA Nitesh Rane Criticize Shivsena BMC Kangana Ranaut Court Case Spent News Updates.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x