बापरे | आरोग्य सेतू अॅप कुणी बनवलं ते मोदी सरकारला माहित नाही | डेटा कोणाकडे?
नवी दिल्ली, २८ ऑक्टोबर : कोरोनाचा प्रसार वेगाने सुरु झाल्यापासून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेल्या आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्याचं आवाहन केलं जात आहे. प्रवासासह अनेक ठिकाणी हे अॅप सक्तीचं करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे बॉलीवूडच्या मोठ्या अभिनेत्याने त्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने जाहिरात करून मोठा खर्च देखील केला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनंही या अॅपचं कौतुक केलं आहे. मात्र, या अॅपबद्दल केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, राष्ट्रीय माहिती केंद्र (National informatics centre) यांनी हे अॅप कुणी तयार केलं याविषयी काहीही माहिती नसल्याचं उत्तर दिलं आहे. माहिती अधिकारात विचारण्यात आलेल्या माहितीवर हे अजब उत्तर देण्यात आलं असून, केंद्रीय माहिती आयोगानं यावरून फैलावर घेतलं आहे. मे महिन्यातच हे सेतू अॅप १०० मिलियन ग्राहकांनी डाउनलोड केलं आहे. याबाबत स्वतः आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली होती.
100 million users on Aarogya Setu. Together we can fight COVID19.
Download Aarogya Setu and Stay Safe.#IndiaFightsCorona #SetuMeraBodyguard#AatmanirbharBharat pic.twitter.com/V619c44nSz— Aarogya Setu (@SetuAarogya) May 12, 2020
लाईव्ह लॉ’ने हे वृत्त दिलं आहे. केंद्रीय माहिती आयोगाने (CIC) मंगळवारी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी (CPIO), राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC) व NeGD यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आरटीयच्या अधिनियमांनुसार कलम २० अंतर्गत गुन्हा का दाखल केला जावू नये? असा सवाल केला आहे. या सर्वांवर आरोग्य सेतु अॅप संबंधित आरटीआयला प्रतिसाद आणि उत्तर न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरटीआयमध्ये मिळालेलं धक्कादायक अधिकृत उत्तर तुम्ही येथे वाचू शकता.
आरोग्य सेतूच्या वेबसाइटवर हे अॅप एनआयसीच्या प्लॅटफॉर्मवर डिझाईन, डेव्हलप आणि होस्ट करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, एनआयसीला यासंदर्भात माहिती कशी नाही असा सवाल केंद्रीय माहिती आयोगानं केला आहे. केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्य आयुक्त एन. सरण यांनी यासंदर्भात लेखी उत्तर मागितले आहे. तसेच त्यांच्याकडे काही माहिती नसल्यास https://aarogyasetu.gov.in/ ही वेबसाइट gov.in या नावाने वेबसाइट कशी तयार केली गेली,” असा सवाल करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं.
He has approached the Commission on the ground that The CPIO, NEGD and Ministry of Electronics & Information Technology did not provide any information on #ArogyaSetu App and website
— Live Law (@LiveLawIndia) October 28, 2020
कोणत्याही केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकाऱ्याने हे अॅप कोणी तयार केले, फाइल्स कोठे आहेत याबद्दल माहिती दिलेली नाही. लाईव्ह लॉने दिलेल्या वृत्तानुसार केंद्रीय माहिती आयोगाने सौरव दास यांच्या तक्रारीनंतर हे आदेश दिले आहेत. “या प्रकरणात एनआयसी, नॅशनल ई-गव्हर्नन्स विभाग (एनजीडी) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आरोग्य सेतु अॅप आणि त्याच्या निर्मितीशी संबंधित अन्य प्रक्रियेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. अॅप तयार करण्याबाबत एनआयसीकडे माहिती नाही असे याचिकेत सांगण्यात आले आहे,” असे एन. सरण यांनी सांगितले. “जर तुम्ही हे अॅप बनवले असेल, तर हे उत्तर आश्चर्यकारक आहे,” अशा शब्दात सरण यांनी कानउघडणी केली आहे.
It is relevant to mention here that Sec 6(3) of the RTI Act cannot be used by public authorities to push off the matter: CIC#RTI #ArogyaSetu @GoI_MeitY
— Live Law (@LiveLawIndia) October 28, 2020
News English Summary: The Central Information Commission on Tuesday issued show-cause notices to the CPIOs, Ministry of Electronic, National Informatics Centre,NeGD as to why penalty u/s 20 of the RTI Act should not be imposed on them for prima facie obstruction of information and providing an evasive reply on an RTI application related to Arogya Setu App. CIC also asked NIC to explain that when in the Aarogya Setu website it is mentioned that the platform was designed, developed and hosted by it, then how is it that they do not have any information about creation of the App.
News English Title: Modi government do not know who made Arogya Setu App reply to RTI Application News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल