24 November 2024 8:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

शिवसेनेचे भंडाऱ्याचे नाराज जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले भाजपात

भंडारा : लोकसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे भंडाऱ्याचे नाराज जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. त्याआधी त्यांनी शिवसेना भंडारा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर येथे राजेंद्र पटले यांनी भाजपात अधिकृत प्रवेश करून शिवसेनेनेला जय महाराष्ट्र केला आहे. महत्वाचं म्हणजे नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर भंडारा-गोंदिया मतदारसंघात लोकसभा पोटनिवडणूक होत आहे. त्याच वेळी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने अखेर त्यांनी भाजपात प्रवेश करून शिवसेनेला धक्का दिला आहे.

राजेंद्र पटेल यांचा भाजपला तुमसर विधानसभा मतदारसंघात फायदा होईल आणि त्याचीच जोड लोकसभेतही होणार आहे. भंडाऱ्यात पोवार समाजाचा दबदबा असल्याने त्यांचा फायदा भाजपला आगामी निवडणुकीत होणार असल्याचे समजते.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x