18 April 2025 2:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | 1,988 टक्के परतावा देणारा डिफेन्स कंपनी स्टॉक खरेदी करा, संधी सोडू नका - NSE: APOLLO Rattan Power Share Price | 10 रुपयाचा पेनी स्टॉक देईल मोठा परतावा, यापूर्वी दिला 627% परतावा - NSE: RTNPOWER BHEL Share Price | अशी संधी सोडू नका, मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, टार्गेट जाणून घ्या - NSE: BHEL IRB Share Price | संधी सोडू नका, आयआरबी इन्फ्रा शेअर देणार एवढा परतावा, यापूर्वी 502% रिटर्न दिला - NSE: IRB Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार
x

गोपीनाथ मुंडेंच्या काळातला दबदबा उरला नाही | पंकजांच्या नैतृत्वावर भाजपमधून प्रश्नचिन्ह

Pankaja Munde, Beed, Sugarcane workers, MLA Suresh Dhas

औरंगाबाद, २९ ऑक्टोबर: मराठवाड्यात पंकजा मुंडे या भाजपच्या दिग्गज राजकारणी आहेत. स्व. गोपीनाथ मुंडे यांचा वारसा लाभलेल्या पंकजा मुडेंवर गोपीनाथ मुंडेंचं नाव आणि दबदबा पुढे करून पक्षांतर्गत राजकीय हल्ले सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. ऊसतोड कामगारांच्या आडून सध्या सुरु झालेले राजकीय हल्ले भविष्यात इतर विषयात देखील तोंडवर काढतील अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

त्यासाठी भाजपचे आ. सुरेश धस यांचा वापर होण्याची दाट शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजनांच्या आडून असंच राजकारण एकनाथ खडसे यांच्याबाबतीतही झालं होतं. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा राजकीय दबदबा नसल्याचं प्राथमिक चित्र उभं केलं जाण्याची दाट शक्यता आहे.

भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या काळात ऊसतोड कामगार, मुकादम संघटनांचा साखर संघात दबदबा होता. पण आता परिस्थीती बदलली आहे. दरम्यान १४ टक्क्यांची मजुरीत दरवाढ देण्याचा निर्णय घेऊन या कष्टकरी ऊसतोड मजुरांची चेष्टा करण्यात आल्याचा घणाघात आमदार सुरेश धस यांनी एका मुलाखती दरम्यान केला आहे. गोपीनाथ मुंडेंनी जी दरवाढ किंवा निर्णय ठरवला त्याच्यापेक्षा कमी कधी मिळाले नाही. मी तो काळ पाहिला आहे, , ऊसतोड कामागार संघटित नसल्याचा फायदा कारखानदार उचलत आहेत, त्यामुळेच राज्यातील ऊसतोड कामगार, मुकादम, वाहतुकदारांच्या मजुरी आणि कमिशमध्ये वाढ करण्यात यावी या मागणीसाठी संबंधित संघटनांनी संप पुकारला होता.

दरम्यान पुढे बोलताना धस म्हणाले कि, गोपीनाथ मुंडे यांच्या काळात साखर संघ असो कि लवाद, तिथे ऊसतोड मजुर, कामगार, मुकादमांच्या संघटनाचा एक वेगळाच दबदबा होता. मात्र दुर्दैवाने तो दबदबा आता राहिला नाही, हे मान्यच करावे लागेल. तो जर असता तर आज आमची १४ टक्के वाढ देऊन बोळवण केली गेली नसती. विशेष म्हणजे शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला हे तर त्याहून अधिक आश्चर्यकारक म्हणावे लागेल. असं धस यांनी म्हंटल आहे.

आज जो संप मागे घेण्यात आला आहे, त्यामागे केवळ ऊसतोड मजुर, मुकादमांचे संसार उघड्यावर येऊ नयेत, मजुरांची पळवापळवी होऊ नये ही कारणे आहेत. पण म्हणून आम्ही हा अन्याय सहन करणार असा अर्थ कुणीही काढू नये. फेब्रुवारी महिन्यात फडावर देखील संप होऊ शकतो हे आम्ही दाखवून देवू, असा इशाराही धस यांनी यावेळी दिला. ऊसतोड मजुर, मुकादम, वाहतुकदारांना जी वाढ साखर संघाच्या बैठकीत जाहीर करण्यात आली आहे. त्याने ऊसतोड संघटना, मजुर, मुकादम देशोधडीला लागणार आहेत.

 

News English Summary: In Marathwada, Pankaja Munde is a veteran BJP politician. Late. Gopinath Munde’s successor, Pankaja Mude, has seen the onslaught of Gopinath Munde’s name and dominance. Political analysts have said that the ongoing political attacks on sugarcane workers are likely to spill over into other issues in the future.

News English Title: Anti Pankaja Munde politics is started in Beed behind sugarcane workers issues News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या