22 November 2024 6:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

VIDEO | आणि रस्त्याच्या किनारी ब्लॅक पँथर उभा होता | अगदी जवळ

A black panther, roaming in a forest, IFS officer Parveen Kaswan

नवी दिल्ली , २९ ऑक्टोबर: जंगलात फिरत असलेल्या एका ब्लॅक पँथरचा व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र हे दुर्मिळ दृश्य भारतातील रस्त्यावर कैद झाले असल्याचं समजलं असलं तरी अजूनपर्यंत निश्चित स्थळाबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. भारतीय वनसेवेतील अधिकारी प्रविण कासवान यांनी ट्विटरवर या ब्लॅक पँथरचा व्हिडीओ शेअर केला आहे. वनविभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांना हा व्हिडीओ पाठवला होता. शिकाऱ्यांना ब्लॅक पँथरचा ठावठिकाणा लागू नये यासाठी जागेचा खुलासा केलेला नाही. प्रविण कासवान हे नेहमीच असे प्राण्यांचे फोटो समाज माध्यमांवर शेअर करत असतात.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या किनारी ब्लॅक पँथर उभा आहे. जेव्हा त्याला कार दिसते त्याक्षणी तो दूर जाण्याचा प्रयत्न करतो. बराच वेळ रस्त्यावर फिरल्यानंतर ब्लॅक पँथर जंगलाच्या दिशेने जातो. हा व्हिडीओ कारमध्ये बसलेल्या एका माणसाने शूट केला आहे. प्रवीण कासवान यांनी या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, भारताचा ब्लॅक पँथर. हा व्हिडीओ २४ ऑक्टोबरला ट्विटरवर शेअर करण्यात आला होता.

 

News English Summary: A video of a black panther roaming in a forest is going viral on social media. The video was filmed somewhere in India, although the exact location has not been disclosed. The clip in question was shared on Twitter by Indian Forest Service officer Parveen Kaswan, who said it was forwarded to him by staff at the forest. Mr Kaswan withheld the exact location of the black panther, possibly to prevent poachers from reaching the spot.

News English Title: A black panther roaming in a forest is going viral on social media shared by Indian Forest Service officer Parveen Kaswan news updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x