मुंबई पोलीस दल जगातील एक चागंल पोलीस दल | न्यायालयाने पाठ थोपटली
मुंबई, ३१ ऑक्टोबर: कोरोना, लॉकडाऊनच्या काळात पोलीस त्यांचे कर्तव्य अत्यंत दबावाखाली पार पाडत आहेत. विपरीत परिस्थितीतही चाेख कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे त्यांना नागरिकांनीही सहकार्य करावे. मुंबई पोलीस हे जगातील उत्तम पोलिसांपैकी एक असल्याचे मानण्यात येते, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी म्हटले. या काळात पोलिसांचे काम कठीण होते. पोलीस दबावाखाली होते. त्यानंतर मिरवणूक, मोर्चे इत्यादींसाठी बंदोबस्त करण्याचे कामही होते, असे निरीक्षण न्या. एस. एस. शिंदे व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने नोंदविले.
न्या. संभाजी शिंदे आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने म्हटलं की, “मुंबई पोलिसांची गणना जगातील सर्वाधिक उत्तम पोलिसांमध्ये केली जाते. त्यामुळे नागरिकांनी त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. न्या. शिंदे म्हणाले, “आधीच मोठ्या तणावाखाली असताना मुंबई पोलिसांचं काम हे महामारीच्या काळातील कठीण समयी खूपच अवघड बनलं होतं. पोलीस अधिकारी सातत्याने काम करीत होते. १२ तासांहून अधिक काळ ते काम करीत होते. त्यानंतर सुरु झालेले मोर्चे आणि सणवार यांच्यासाठी बंदोबस्तालाही ते तैनात होते.”
गेल्या काही दिवसांत मुंबई पोलीस दल टीका-टिपण्णीद्वारे चर्चेत राहिलं आहे. मात्र, कोणी काहीही म्हणो मुंबई हायकोर्टाने मुंबई पोलिसांची पाठ थोपटली आहे. हे पोलीस दल जगातील एक चागंल पोलीस दल असल्याचं मत हायकोर्टानं नोंदवलं आहे. तसेच कोविडच्या प्रचंड तणावाच्या काळातील मुंबई पोलीसांच्या चांगल्या कामगिरीचे कौतुकही केलं आहे.
सुनैना होले यांच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान खंडपीठानं मुंबई पोलिसांबाबत हे मत व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात होले यांनी आक्षेपार्ह मजूकर सोशल मीडियातून पोस्ट केला होता. यासाठी त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याची सुनावणी हायकोर्टात सुरु असताना खंडपीठानं मुंबई पोलिसांबाबत निरिक्षण नोंदवलं. गुरुवारी ही केस कोर्टात सुनावणीसाठी आल्यानंतर वकिलांनी कोर्टाला सांगितलं की, खोले या बीकेसी पोलीस ठाण्यात आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहिलेल्या नाहीत तसेच त्या पोलिसांनी सहकार्यही करीत नाहीत.
News English Summary: Corona, during the lockdown, the police are carrying out their duties under extreme pressure. Even in adverse circumstances, the checkers are performing their duties. Therefore, citizens should also cooperate with them. Mumbai Police is considered to be one of the best police in the world, the High Court said on Thursday. Police work was difficult during this period. The police were under pressure. After that, arrangements for processions, marches, etc. were also made. S. S. Shinde and Justice. M. S. Reported by Karnik’s bench.
News English Title: Mumbai Police is one of the best police force in the world says Mumbai High Court News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार