22 November 2024 7:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

कांद्याच्या दरांनी रडवल्यानंतर आता मिरचीने सर्वसामान्य जनतेला ठसका बसणार

onion high rates, chili rates high, Vegetable Market

नंदुरबार, ३१ ऑक्टोबर: काही दिवसांपूर्वी कांद्याने सामान्य ग्राहकांच्या डोळयात पाणी आणल्याचं पाहायला मिळालं. रोजचा प्रपंच चालावं देखील गृहिणींना कठीण झालं होतं. संपूर्ण किचनचा बजेटच बिघडल्याने गृहिणी देखील संताप व्यक्त करत होत्या.

मात्र कांद्याने रडवल्यानंतर आता मिरची सर्वसामान्य जनतेला ठसका बसवणार आहे. नंदुरबार जिल्हा हा मिरचीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने यंदा मिरचीचे उत्पादन कमी होणार आहे. उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे मिरचीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरवरर्षी नंदुरबार जिल्ह्यात मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मात्र यंदा अतिवृष्टीने मिरचीच्या उत्पादनाला फटका बसला आहे. त्यातच भर म्हणून यावर्षी मिरचीवर बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. या दुहेरी संकटांमुळे यावर्षी मिरची उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची चिन्हं आहेत.

जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने तेरा एकर क्षेत्रावर मिरचीची लागवड केली होती. दरवर्षी त्यांना त्यातून तीनशे क्विंटलचे उत्पादन होत होते. मात्र, यावर्षी अतिवृष्टी आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे तब्बल 70 टक्के उत्पादन घटले आहे. शेतीसाठी गुंतवलेलं भाडवल देखील निघणे अशक्य असल्याचे शेतकऱ्याने सांगितले आहे.

 

News English Summary: After high rates of onion, now the chili rates is going to shock the general public. Nandurbar district is famous for its pepper production. However, due to heavy rains, the production of chillies will be reduced this year. Pepper prices are expected to rise sharply due to lower production and higher demand.

News English Title: After onion high rates chili rates may reach to high level news updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x