22 November 2024 1:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

स्वतःच्या जाहिरातीसाठी मोदी सरकारने करदात्यांचे ७१३ कोटी उधळले | प्रति दिन २ कोटी

Modi government, spent rupees 713 crore, Taxpayers money, Ads last year RTI

नवी दिल्ली, २ नोव्हेंबर: नरेंद्र मोदी सरकारने गेल्या आर्थिक वर्षात करदात्यांच्या पैशातील सुमारे 713.20 कोटी रुपये खर्च केले ज्यामुळे वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि होर्डिंग्ज इत्यादी जाहिरातींद्वारे स्वतःची जोरदार जाहिरातबाजी केल्याचं समोर आलं आहे.

आरटीआय कार्यकर्ते जतिन देसाई यांनी माहितीच्या कायद्यांअंर्तगत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या ब्यूरो ऑफ आऊटरीच अँड कम्युनिकेशन यांनी म्हटले आहे की केंद्र सरकारच्या सन २०१९-२०२० दरम्यानच्या जाहिरातींवर दररोज सरासरी १.९८ कोटी रुपये खर्च केले गेले आहेत. त्यामुळे मोदी सरकार करदात्यांच्या पैशातून स्वतःचा किती प्रचार करून घेत आहेत याचं सत्य समोर आलं आहे. परिणामी मोदी नेहमीच चर्चेत राहतील याची जनतेच्या पैशातूनच काळजी घेतली जातं आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

मागील आर्थिक वर्षामध्ये लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकही पार पडली. ७१३ कोटींपैकी इलेक्ट्रॉनिक मीडियावर ३१७ कोटी ५ लाख, प्रिंट मीडियावर २९५ कोटी ५ लाख आणि आऊटडोअर म्हणजेच होर्डींग आणि जाहिरातींवर १०१ कोटी १० लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केलं आहे.

मात्र देसाई यांच्या या अर्जाला उत्तर देताना मोदी सरकारने विदेशातील प्रचारासाठी किती पैसा खर्च केला यासंदर्भातील माहिती दिलेली नाही. याआधी जून २०१९ मध्ये मुंबईतील आरटीआय कार्यकर्ता असणाऱ्या अनिल गलगली यांनी दाखल केलेल्या एका अर्जाला उथ्तर देताना मंत्रालयाने प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, आऊटडोअर आणि प्रिंट प्रचारासाठी एकूण तीन हजार ७६७ कोटी २६ लाख ५१ हजार रुपये खर्च केल्याची माहिती दिली होती.

 

News English Summary: The Narendra Modi government spent about Rs 713.20 crore on taxpayers’ money in the last financial year, which has led to self-promotion through advertisements in newspapers, electronic media and hoardings. Replying to a query by RTI activist Jatin Desai under the Information Act, the Bureau of Outreach and Communication, which works under the Ministry of Information and Broadcasting, said that an average of Rs 1.98 crore was spent on advertisements by the central government every day between 2019 and 2020. Therefore, the truth has come out about how much the Modi government is promoting itself with the taxpayers’ money. As a result, the question arises as to whether the people’s money is being used to ensure that Modi will always be in the spotlight.

News English Title: Modi government spent rupees 713 crore 20 lakhs of taxpayers money on ads last year RTI News Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x