विधानपरिषद | यादी बाजूला करण्याचं त्यांचं आधीच ठरलंय | मुश्रीफ यांचा गौप्यस्फोट

मुंबई, २ नोव्हेंबर: विधानपरिषदेसाठी कोणत्या पक्षाकडून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून कोणाला संधी मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. आज विधानपरिषदेसाठी १२ जागांसाठी उमेदवारांच्या नावांची शिफारस ठाकरे सरकारकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली जाणार असल्याचं वृत्त आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन अधिकृत यादी सुपूर्द करणार आहेत. त्यामुळे संबंधित यादीत कोणाची नावं असणार आहेत याची चिंता तीनही पक्षातील नेते मंडळींना आहे. विशेष म्हणजे त्यानंतर पुन्हा राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये नवा वाद निर्माण होणार नाही ना हे देखील पाहावं लागणार आहे.
दुसरी महत्वाची उत्सुकता म्हणजे या यादीत एकनाथ खडसे यांचं नाव असणार का याची चर्चा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगली आहे. सध्या तरी एकनाथ खडसे यांनी आपण कोणत्याही पदाची मागणी केल्याचं म्हटलं नसलं तरी एका अनुभवी नेत्याला राष्ट्रवादी नेमकी कोणती भूमिका देणार ते पाहावं लागणार आहे.
दुसरीकडे एकनाथ खडसे यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या शक्यतेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील कार्यरत झाल्या आहेत. त्यांनी स्वतः या संदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन खडसेंच्या नावाला तीव्र विरोध दर्शविल्याने पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष या संदर्भात नेमकी कोणती भूमिका घेणार ते पाहावं लागणार आहे.
मात्र महाविकास आघाडी सरकारमधील महत्वाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांची महाविकास आघाडी सरकारकडून येणारी नावं बाजूला सारण्याचा घाट घातला गेल्याची धक्कादायक माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. विशेष म्हणजे ते पुढे म्हणाले की, माझं आणि देवेंद्र फडणवीस यांचं बोलणं झालेलं आहे. राज्यपालांशी त्यांची आधीच चर्चा झालेली आहे. ही आलेली यादी बाजूला काढून ठेवण्याचं ठरलेलं असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सांगितल्याचा धक्कादायक दावा हसन मुश्रीफ यांनी केल्याने पुन्हा राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार वाद पेटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. TV 9 मराठीने याबाबत वृत्त दिलं आहे.
News English Summary: Hassan Mushrif, a key minister in the Maha Vikas Aghadi government, has made a big splash. State Rural Development Minister Hasan Mushrif has given a shocking information that the names of the MLAs appointed by the Governor have been sidelined by the Maha Vikas Aghadi government. He further said that Devendra Fadnavis and I have spoken. He has already had discussions with the governor. Hasan Mushrif’s shocking claim that BJP state president Chandrakant Patil had said that the list was set to be set aside has raised the possibility of another Mahavikas Aghadi government litigation against the governor.
News English Title: Minister Hassan Mushrif statement over MLC 12 seats may hold by Governor News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL