अकरावी प्रवेश | राज ठाकरेंची शिक्षण मंत्र्यांसोबत फोनवर चर्चा | उद्या निर्णय अपेक्षित

मुंबई, २ नोव्हेंबर: बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेवर मार्ग निघत नसल्याने कोचिंग क्लासच्या शिष्टमंडळाने आणि पालकांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेऊन सदर विषयात लक्ष घालण्याची विनंती केली. राज्य सरकारच्या निर्णयांमुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली आणि नेमकी कॉलेजेस केव्हा सुरु होणार याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा प्रश्न निर्नाम झाल्याने अनेकांची भविष्य टांगणीला लागली आहेत. तसेच काही विद्यार्थ्यांची अॅडमिशन झाली आहेत, यावर राज ठाकरेंशी सविस्तर चर्चा झाल्याचं वृत्त आहे.
बैठकी दरम्यान काही पालकांनी फी वाढीचा देखील मुद्दा देखील उचलून धरला. विशेष म्हणजे राज्य सरकारच्या अधिकृत GR नंतर देखील काही शाळांनी फी वाढ करून सरकारच्या निर्णयाला केराची टोपली दाखविल्याच निदर्शनास आणून दिलं आहे. तसेच शाळांसोबत कोचिंग क्लासेस सुरु करावेत, या मागणीसाठी आज कोचिंग क्लासेसचे मालक देखील राज ठाकरेंची भेट घेणार आहेत.
दरम्यान, अकरावी प्रवेशाचा प्रश्न मार्गी लागावा यानिमित्ताने राज ठाकरे यांनी थेट शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबत फोन सविस्तर चर्चा केली आणि त्यानंतर आज संध्याकाळी होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार असल्याचं त्यांनी राज ठाकरेंच्या कानावर घातलं आहे. त्यामुळे याबाबत उद्यापर्यंत सविस्तर माहिती देऊन प्रश्न मार्गी लागण्याच्या हालचाली राज्य सरकारच्या दरबारी होणार असल्याचं वृत्त आहे.
News English Summary: The coaching class delegation and parents today called on Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray at Krushnakunj and asked him to look into the matter. Due to the decisions of the state government, the admission process of class XI has been postponed and there is a lot of confusion among parents and students as to when the colleges will start. The future of many is hanging in the balance as the question of students’ academic year has been raised in it. Also, some students have been admitted, it is reported that a detailed discussion has been held with Raj Thackeray on this.
News English Title: MNS Chief Raj Thackeray talked with Education minister Varsha Gaikawad regarding eleventh standard admission process news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL