22 April 2025 9:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

विधान परिषद | राज्यापालांकडे संविधानिक अधिकार | त्याचं सर्वांना पालन करावेच लागेल

BJP State President Chandrakant Patil, Governor constitutional rights

पुणे, २ नोव्हेंबर: विधान परिषदेच्या १२ जागांचा प्रश्न पुन्हा वादाच्या रूपात समोर येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारमधील प्रतिनिधी आणि भारतीय जनता पक्षातून येणाऱ्या वक्तव्यातून त्याचे संकेत मिळू लागले आहेत. याबाबत प्रसार माध्यमांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे विचारणा केली. त्यावर व्यक्त होताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘राज्यापालांकडे संविधानिक अधिकार असतात आणि त्याचं सर्वांना पालन करावेच लागेल’. पाटील यांनी केलेल्या सूचक वक्तव्यातून राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे असं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे.

राज्यपाल भारतीय जनता पक्षाला वारंवार झुकतं माप देतात अशी चर्चा सध्या रंगली आहे आणि त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य काळे आहे. पुण्यातील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत आहोत मात्र यावेळी त्यांनी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रश्नांवर उत्तर न देता त्यावर मौन बाळगणं पसंत केल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील महत्वाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांची महाविकास आघाडी सरकारकडून येणारी नावं बाजूला सारण्याचा घाट घातला गेल्याची धक्कादायक माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. विशेष म्हणजे ते पुढे म्हणाले की, माझं आणि देवेंद्र फडणवीस यांचं बोलणं झालेलं आहे. राज्यपालांशी त्यांची आधीच चर्चा झालेली आहे. ही आलेली यादी बाजूला काढून ठेवण्याचं ठरलेलं असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सांगितल्याचा धक्कादायक दावा हसन मुश्रीफ यांनी केल्याने पुन्हा राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार वाद पेटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

News English Summary: The issue of 12 seats in the Legislative Council is likely to come up again in the form of controversy. Statements from state government representatives and the Bharatiya Janata Party (BJP) are beginning to show signs of that. The media asked Bharatiya Janata Party state president Chandrakant Patil about this. Expressing his views on this, Chandrakant Patil said, “Governors have constitutional rights and everyone has to abide by them.” Political analysts have said that Patil’s suggestive statement is likely to re-ignite the governorship dispute against the state government.

News English Title: BJP State President Chandrakant Patil statement over Governor constitutional rights News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या