22 November 2024 12:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

माध्यम स्वातंत्र्यावरील आघाताला ४ वर्ष पूर्ण | मोदी सरकारने NDTV Blackout चा निर्णय घेतला होता

NDTV India, blackout, November 2016, Modi Government

नवी दिल्ली, ०५, नोव्हेंबर: काल महाराष्ट्रात अर्णब गोस्वामीला त्याच्या व्यावसायिक कारणातील कुरापतीमुळे म्हणजे अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. वास्तविक याचा पत्रकारितेवरील हल्ल्याशी कोणताही संबंध नाही. संपूर्ण विषय अन्वय नाईक कुटुंबीय आणि अर्णब गोस्वामीच्या मालकीच्या रिपब्लिक टीव्ही दरम्यानचा आहे. मात्र भाजपकडून पत्रकारितेवरील हल्ल्याची बोब सुरु असून त्याचा थेट आणीबाणीशी संबंध जोडला जात आहे.

वास्तविक दुसरी खरी आणीबाणी २०१६ मध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात देशाने आणि पत्रकारांनी अनुभवली होती. मोदी सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीवर घातलेल्या एक दिवसाच्या बंदीच्या निर्णयाला याच महिन्यात ४ वर्ष पूर्ण होतं आहेत. पठाणकोट दहशतवादी हल्ल्याची संवेदनशील माहिती प्रसारित केल्याचा ठपका ठेवत मोदी सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या एका समितीने ९ नोव्हेंबर रोजी एनडीटीव्हीचे प्रसारण एका दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. या माहितीचा उपयोग दहशतवाद्यांचे हँडलर्स करू शकले असते, असंही त्यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं म्हटलं होतं.

मात्र विषय सर्वोच्च न्यायालयात जाताच मोदी सरकार बिथरलं आणि अखेर बॅकफूटवर येत तात्पुरती स्थगिती दिली होती. तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री वेंकय्या नायडू यांनी ती घोषणा केली होती. एनडीटीव्हीनं त्या बंदीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून दाद मागितली होती. त्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार इतक्यात अचानक माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ही बंदी उठवल्यानं केंद्र सरकारचा हेतू समोर आला होता. तो माध्यमांना घाबरविण्याचा एक प्रयत्न तर नव्हता ना असा प्रश्न त्यावेळी उपस्थित करण्यात आला होता.

त्यावेळी एनडीटीव्हीवरील एका दिवसाच्या बंदीचा सर्वत्र निषेध होत असतानाच हा प्रकार म्हणजे माध्यम स्वातंत्र्यावर आघात आहे, अशी टीका सर्वस्तरांतून होत होती. या सर्व पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं या बंदीला स्थगिती दिल्याने मोदी सरकार तोंडघशी पडले होते.

 

News English Summary: Arnab Goswami was arrested in Maharashtra yesterday in connection with Naik’s suicide case. In fact, it has nothing to do with the attack on journalism. The whole subject matter is between the Naik family and Republic TV owned by Arnab Goswami. However, the BJP has launched an attack on journalism, which is being linked directly to the emergency.

News English Title: NDTV India blackout November 2016 Modi Government News Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x