22 November 2024 2:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

पराभव दिसू लागताच ट्रम्प यांचे प्रक्षोभक व चुकीचे दावे | माध्यमांनी प्रक्षेपण रोखलं

American TV Channels Stop Trump Speech, Joe Biden, Donald Trump

वॉशिंग्टन, ६ नोव्हेंबर: मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध प्रतिस्पर्धी ज्यो बिडन यांनी आघाडी घेतल्यानंतर ट्रम्प बरेच संतापल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, पराभव समोर दिसू लागल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार जो बायडेन तसेच डेमोक्रॅटसवर प्रसार माध्यमांतून हल्लाबोल केला.

धक्कादायक गोष्ट म्हणजे डेमोक्रॅटसवर निवडणूक प्रक्रियेत घोटाळा केल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. तसेच निकाल जाहीर होण्याआधीच स्वत:च्या विजयाची घोषणा त्यांनी केली. तसेच गुरुवार पर्यंत ट्रम्प यांचे आरोप कायम राहिल्याने, अमेरिकेतील अनेक टीव्ही वृत्तवाहिन्यांनी मध्येच त्यांच्या भाषणाचे प्रसारण पूर्णपणे थांबवले.

प्रसार माध्यमांच्या मते ट्रम्प अत्यंत चुकीची माहिती पसरवत असल्याबद्दल त्यांच्या भाषणाचे प्रसारण अखेर रोखले. निवडणुकीच्या रात्रीनंतर डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदाच जनतेसमोर आले. त्यानंतर त्यांनी काल व्हाइट हाऊसमधल्या १७ मिनिटाच्या पत्रकार परिषदेत ट्रम्प अनेक प्रक्षोभक आणि चुकीचे दावे केले.

डेमोक्रॅटस बेकायद मतांच्या आधारे आमच्या हातातून विजय चोरण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांनी केला. ट्रम्प यांचे हे दावे आणि ते चुकीची माहिती पसरवत असल्याबद्दल NBC आणि ABC वृत्तवाहिन्यांनी तात्काळ LIVE कव्हरेज थांबवले असे वृत्त AFP’ने दिले आहे. “अमेरिकेसाठी ही वाईट रात्र आहे. त्यांचे राष्ट्राध्यक्षच लोकांवर निवडणुकीत विजय चोरण्याचा प्रयत्न होतोय असा चुकीचा आरोप करतायत” असे CNN’च्या अँकरने म्हटले. कोणताही ठोस पुरावा नसताना धादांत खोटे आरोप केले जातायत असे CNN’च्या अँकरने म्हटले.

 

News English Summary: Trump is furious after the countdown began, with rival Joe Biden taking the lead against incumbent President Donald Trump. Meanwhile, in the face of defeat, Donald Trump attacked the rival candidate Joe Biden as well as the Democrats in the media. The shocking thing is that he has directly accused the Democrats of rigging the election process. He also declared his victory before the results were announced. Also, as Trump’s allegations persisted until Thursday, several US TV news outlets stopped broadcasting his speech altogether.

News English Title: Several American TV Channels Stop Trump Speech Live Coverage Midway News updates.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x