22 April 2025 6:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 23 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | आयआरबी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB Reliance Power Share Price | शेअर प्राईस 43 रुपये; रिलायन्स पॉवर शेअर्सबाबत फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Apollo Micro Systems Share Price | तगडा परतावा मिळेल, हा डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार - NSE: APOLLO Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 23 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRFC Share Price | 433 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरसाठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC NBCC Share Price | 4 रुपयांचा शेअर 101 रुपयांवर आला, जबरदस्त तेजीत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC
x

पंकजा मुडेंना माजलगाव नगरपालिकेत राष्ट्रवादीकडून राजकीय धक्का

NCP candidate, Beed Majalgaon Mayoral Election, Pankaja Munde

बीड, ६ नोव्हेंबर: मराठवाड्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (BJP Leader and former Minister Pankaja Munde) यांना राष्ट्रवादीने जोरदार राजकीय धक्का दिला आहे. माजलगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष निवडणुकीत (Mayoral Election in Majalgaon Municipality) भारतीय जनता पक्षावर चक्क आपल्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याची वेळ आली. एनसीपीने भारतीय जनता पक्षाला राजकीय दणका दिल्याने माजलगावच्या नगराध्यक्षपदी शेख मंजूर यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंना बीड जिल्ह्यातच राष्ट्रवादीने एकावर एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या रेश्मा मेंडके यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी लागणार एकूण संख्याबळच उपलब्ध नसल्याने उमेदवारी अर्ज मागे घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. परिणामी राष्ट्रवादीचे शेख मंजूर यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहिला. यामुळे त्यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. आता त्यांची केवळ घोषणा करण्याची औपचारिकता शिल्लक आहे.

तत्पूर्वी, माजलगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष तब्बल ३ महिने गैरहजर राहिल्याने त्यांना पदावरुन बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर या पदासाठी निवडणुक प्रक्रिया पार पडली आणि त्यात राष्ट्र्वादीने बाजी मारली आहे.

 

News English Summary: The NCP has given a strong political push to Bharatiya Janata Party leader and former minister Pankaja Munde in Marathwada. In the mayoral election in Majalgaon municipality, it is time for the Bharatiya Janata Party to withdraw its official candidate’s application. Sheikh Manzoor’s unopposed election as the mayor of Majalgaon has been confirmed as the NCP has given a political blow to the Bharatiya Janata Party. Therefore, in Beed district itself, the NCP has started pushing Pankaja Munde one by one.

News English Title: NCP candidate unopposed in Beed Majalgaon Mayoral Election News Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या