22 November 2024 7:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

ट्रम्प यांचं आडमुठे धोरण | बायडेन यांना आत्ताच राष्ट्राध्यक्ष दर्जाची सुरक्षाव्यवस्था

US Presidential Election 2020, Joe Biden, Donald Trump, security increases

वॉशिंग्टन, ७ नोव्हेंबर: अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदी विराजमान होण्यासाठी किमान २७० इलेक्टोरल कॉलेज व्होट आवश्यक असतात. बायडेन (Joe Biden) यांनी एकूण २६४ इलेक्टोरल कॉलेज व्होट मिळवले आहेत. दुसरीकडे ट्रम्प यांना आतापर्यंत २१४ इलेक्टोरल कॉलेज व्होट मिळाले आहेत. दरम्यान अध्यक्षीय निवडणुकीत डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी निर्णायक आणि ट्रम्प यांनी धोबीपछाड करणारी आघाडी घेतल्याचे स्पष्ट संकेत दिसताच त्यांना राष्ट्राध्यक्ष दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

दरम्यान, मोठ्या प्रमाणात झालेल्या टपाली मतदानाची मोजणी अद्याप सुरू असून ती पूर्ण झाल्याखेरीज अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल लागला, असे समजले जाऊ नये, असे डोनाल्ड ट्रम्प यांचे म्हणणे आहे. परंतु, बायडेन यांनी घेतलेल्या आघाडीमुळे तेच अध्यक्ष होतील, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित अध्यक्षांना जी सुरक्षाव्यवस्था पुरवली जाते, तशी सुरक्षा बायडेन यांना देण्यासाठी सिक्रेट सर्व्हिसच्या अतिरिक्त तुकड्यानी डेलावेअरला दिशेने कूच केली आहे.

बायडेन यांची अध्यक्षपदी निवड झाली तरी त्यांचा शपथविधी पुढील वर्षी म्हणजे २० जानेवारी रोजी होईल. त्यामुळे तोपर्यंत बायडेन यांची सुरक्षाव्यवस्था कडेकोट ठेवली जाईल. ट्रम्प यांनी आडमुठे धोरण अवलंबले असल्याने त्यांच्या मनात काही भीषण शिजतंय का अशी शंका व्यक्त होतं आहे आणि परिणामी ते सत्तांतर सहजासहजी होऊ देतील असं वाटू लागल्याने सुरक्षा यंत्रणा काळजी घेत आहेत. दरम्यान, डेलवेअर येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये बायडेन मोठी घोषणा करणार असल्याचे त्यांच्या प्रचारयंत्रणेमार्फत सांगण्यात आले. त्यामुळे त्या परिसरातही सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी असलेले बायडेन २००९ ते २०१७ या कार्यकाळात अमेरिकेचे उपाध्यक्ष होते. या कार्यकाळात बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. ओबामांच्या नंतर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्षपदी (US President Donald Trump) विराजमान झाले. सध्याच्या निवडणुकीत पराभव झाल्यास अमेरिकेच्या व्यवस्थेनुसार २० जानेवारी २०२१ रोजी ट्रम्प पदमुक्त होतील आणि बायडेन अध्यक्षपदाची शपथ घेतील. मात्र ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांच्या मनात नेमका कोणता कट शिजतोय अशी राजकीय चर्चा सुरु झाली आहे.

कारण फिलाडेल्फिया येथे मतमोजणी केंद्राजवळ दोन बंदुकधाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पोलिसांनी बंदुका जप्त केल्या आहेत. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत असल्याचं वृत्त आहे. दरम्यान पेनसिल्वेनिया, जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना, अॅरिझोना येथील मतमोजणी अजून सुरू आहे. तर या मतमोजणीत अनेक ठिकाणी बायडेन हेच आघाडीवर आहेत. याच कारणामुळे निकाल जाहीर होण्यास वेळ लागला तरी बायडेन यांचा विजय होण्याची शक्यता अधिक दिसत आहे.

एकाबाजूला बायडेन यांच्या विजयाचे चित्र असल्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षात (Democratic Party) आनंदाचे वातावरण आहे. तर ट्रम्प यांच्या पराभवाची शक्यता दिसू लागल्यामुळे रिपब्लिकन पार्टीचा (Republican Party) मतमोजणीतील उत्साह मावळत असल्याचे चित्र आहे तर अनेक ठिकाणी रिपब्लिकन पार्टीचे गडबड गोंधळ घालत आहेत.

 

News English Summary: At least 270 electoral college votes are required to run for president in the United States. Joe Biden received a total of 264 electoral college votes. Trump, on the other hand, has received 214 electoral college votes so far. Democratic presidential candidate Joe Biden, meanwhile, has been given presidential-level security as soon as there are clear indications that he has taken a decisive and Trump-led lead.

News English Title: US Presidential Election 2020 Joe Biden security increases news updates.

हॅशटॅग्स

#America(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x