22 November 2024 8:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO
x

मुख्यमंत्र्यांच्या संवादात अनेक प्रश्न अनुत्तरित | प्रवीण दरेकरांची टीका

opposition leader Pravin Darekar, CM Uddhav Thackeray

मुंबई, 8 नोव्हेंबर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज समाज माध्यमांवरून जनतेशी संवाद साधला. दरम्यान यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं आहे. दिवाळी दोन दिवसांवर आली असताना फटाक्यांमुळं कोरोना वाढण्याची शक्यता देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. तसेच राज्यातील मंदिरे का खुली करत नाहीत? यावरून देखील स्पष्टीकरण दिलं आहे.

लॉकडाऊनची घोषणा झाल्यापासून राज्यभरातील प्रार्थनास्थळे पूर्णपणे बंदे आहेत. अनलॉकची ५’ची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर मंदिरे उघडण्याची मागणी देखील जोर धरु लागली आणि त्यासाठी भारतीय जनता पक्षाने राज्यभर आंदोलनं देखील केली. यासर्व विषयांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधताना भाष्य केलं आहे.

दरम्यान, मुंबई मेट्रोची ३ आरे कारशेडची जागा कांजूरमार्गला स्थलांतरित करण्यावरून विरोधकांकडून सातत्याने टीका करण्यात येत आहेत. या सर्वांची उत्तरं आमच्याकडे आहे. त्यांना योग्य वेळी आम्ही समर्पक उत्तर देऊ. विरोधकांकडून मीठागरांची जमीन आहे असं सांगून विकास कामांच्या प्रकल्पात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही टीकेची चिंता न करता यावर आम्ही काम करत राहू. जर्मनीच्या कंपनीकडून ५४५ दशलक्ष युरोंचं कंपनीकडून माफक दरात कर्ज घेतलं आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

यावर विरोधी पक्ष नेते (विधान परिषद) प्रवीण दरेकर यांनी टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्र्यांचा आजचा संवाद महाराष्ट्रातील जनतेचा केवळ भ्रमनिरास करणार होता. केवळ संवादातून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे. परंतु, या संवादाने जनतेला कुठलीही भरीव गोष्ट मिळाली नाही. आजही मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे, मराठा विद्यार्थ्यांचे भवितव्याचे काय? नक्की सरकार यासंदर्भात काय करणार आहे. अतिवृष्टी व निसर्ग चक्रिवादळामुळे महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत, निसर्ग वादळामुळे झालेल्या नुकसानीची कोकणात मदत मिळाली नाही. महिलांवरील अत्याचाराचा गंभीर प्रश्न आहे. पण यावर मुख्यमंत्र्यांनी काहीच भाष्य केलं नाही, अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

एसटी कर्मचारी रोज आंदोलन करत आहेत. चार महिने झाले तरीही त्यांचे पगार झालेले नाहीत. एसटी कर्मचारी रोज मरणयातना भोगतोय. या कामगारांची दिवाळी कशी गोड होणार, यापैकी कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी आजच्या संवादातून दिले नाही. केवळ सामंजस्य करार करून चालणार नाहीत. त्या कराराची अंमलबजावणी जलद गतीने होताना दिसत नाही. शहरातून ग्रामीण भागामध्ये जे चाकरमानी गेले, त्यांचं भविष्य काय? याचा विचारविनियम होताना दिसत नाही. तसेच याबाबत मुख्यमंत्री संवादात काहीही बोलले नाहीत असे देखी प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले.

 

News English Summary: Meanwhile, the relocation of Mumbai Metro’s 3 Aarey car shed to Kanjur Marg has been criticized by the opposition. We have the answers to all these. We will give them an appropriate answer at the right time. Opponents are trying to add salt to the development project by claiming that there is salt land. We will continue to work on this without worrying about any criticism. The chief minister also said that 545 million euros had been borrowed from a German company at a reasonable rate. Leader of Opposition (Legislative Council) Praveen Darekar has left Tikastra on this.

News English Title: BJP opposition leader Pravin Darekar criticized CM Uddhav Thackeray news updates.

हॅशटॅग्स

#PravinDarekar(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x