5 November 2024 7:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER
x

अमेरिकेत सत्तांतर झालेच आहे | बिहार सुद्धा सत्तांतराच्या शेवटच्या पायरीवर आहे

Shivsena, BJP, Bihar Assembly Election 2020, exit poll

मुंबई, ९ नोव्हेंबर: अमेरिकेत नुकत्याच पार पडलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत मतमोजणीनंतर इतिहास घडला आणि विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी ट्रम्प यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय संपादित केला. अमेरिकेत झालेल्या सत्तांतराची आता जगभरात मोठी चर्चा सुरू आहे. भारतात देखील या निवडणुकीच्या चर्चा सुरू असून, अध्यक्षीय निवडणूक व विद्यमान अध्यक्ष ट्रम्प यांच्यावर भाष्य करताना शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना चिमटा काढला आहे.

“ट्रम्प यांना ऐन ‘कोरोना’ काळात गुजरातमध्ये आमंत्रित करून सरकारी खर्चाने प्रचार केला व त्यातूनच करोनाचे संक्रमण पसरले, हे नाकारता येणार नाही,” असा आरोपही शिवसेनेनं केला आहे.

अमेरिकेत सत्तांतर झालेच आहे. बिहार सत्तांतराच्या शेवटच्या पायरीवर आहे. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालीली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) पराभव होताना स्पष्ट दिसत आहे. आपल्याशिवाय देशाला किंवा राज्याला पर्याय नाही, या भ्रमातून बाहेर काढण्याचे काम जनतेलाच करायचे सते. ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदासाठी कधीच लायक नव्हते. मात्र त्यांच्या माकडचेष्टा आणि थापेबाजीस जनता भुलली. परंतु ट्रम्प यांच्याबाबत केलेली चूक अमेरिकन जनतेने चार वर्षांत सुधारली. त्याबद्दल तेथील जनतेचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच, अशा शब्दात सामनाने अमेरिकन जनतेने दिलेल्या कौलाचे कौतुक केले आहे.

 

News English Summary: The recent US presidential election made history after the vote count and the incumbent President Donald Trump was defeated. Democratic candidate Joe Biden defeated Trump to achieve a historic victory. The transition to the United States is now the subject of much debate around the world. Discussions are also underway in India on this election, with the Shiv Sena tweaking Prime Minister Narendra Modi while commenting on the presidential election and the current President Trump.

News English Title: Shivsena slams BJP over Bihar Assembly Election 2020 exit poll news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x