22 November 2024 8:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

पोलखोल | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडला मोदी सरकारची मंजुरी होती | आता कोर्टात याचिका

Metro Kanjurmarg, car shed, permission, Modi government

मुंबई, ९ नोव्हेंबर: महाविकास आघाडी सरकारने पर्यावरणाच्या अनुषंगाने आरेतील मेट्रो ३ चा कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईकरांनी या निर्णयावर खूप आंनद व्यक्त केला होता. पर्यावरण प्रेमींनी आणि आरे वाचावा आंदोलनात रस्त्यावर उतरलेल्या तरुणाईने देखील राज्य सरकारचे आभार मानले होते. मात्र याला खोडा घातला तो केंद्रातील मोदी सरकारने आणि त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. मात्र आता भारतीय जनता पक्षच तोंडघशी पडण्याची शक्यता आहे. कारण आता मोदी सरकारचीच पोलखोल झाली आहे.

काही दिवसांपासून मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याच्या प्रकरणात केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात मोठा वाद सुरू आहे. दरम्यान, मोदी सरकार दुटप्पी भूमिका घेत असल्याचं समोर आलं आहे. मेट्रो कारशेड आरेऐवजी कांजूरमार्गला उभी करण्यासाठी मोदी सरकारने ३१ जुलैलाच अधिकृत होकार दिला होता. यासाठी मिठागर आयुक्तांना केंद्राच्या मंजूरीचं अधिकृत पत्रही देण्यात आलं होतं. परंतु, आता याप्रकरणी मोदी सरकारने यु-टर्न घेतला आहे.

मोदी सरकारने ३१ जुलैला कांजूरमध्ये मेट्रो कारशेड उभी करण्यासाठी होकार दिला होता. यासाठी मिठागर आयुक्तांना केंद्राकडून मंजूरीचं अधिकृत पत्र देखील देण्यात आलं होतं. तसेच कारशेडसाठी MMRDA सोबत सूचना देखील देण्यात आल्या होता. विशेष म्हणजे आठवडाभरात ४३.७६ हेक्टरच्या सर्व्हेचे आदेश देखील देण्यात आले होते. परंतु सर्व्हेपूर्वी जागा हस्तांतरित केल्याने मोदी सरकारने यु-टर्न घेतला आहे. त्यानुसार कांजूरमध्ये मेट्रो जागेसाठी जुलैमध्ये होकार दिला होता. परंतु आता सप्टेंबरमध्ये नकार देत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यासाठी १० लाख रुपये मंजूर करुन देखील सर्व्हे सुरु करण्यात आला होता.

मेट्रो कारशेड आरेतून कांजूरमार्गला हलवण्याच्या निर्णयाविरोधात मोदी सरकारनं २६ सप्टेंबरला कोर्टात याचिका दाखल केल्याची बाब उघडकीस आली आहे. मुख्यमंत्र्यांनी कारशेडसंदर्भात ११ ऑक्टोबरला निर्णय घेतला होता, पण त्या आधीच केंद्राकडून कांजूरमार्गला कारशेड बनविण्याच्या विरोधात मुंबई हायकोर्टात रिट पिटीशन याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेसंदर्भात महाविकास आघाडी सरकारला माहितीच नसल्याची बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे विधी आणि न्याय विभाग, जिल्हाधिकारीसुद्धा या माहितीपासून अनभिज्ञ असल्याचं समोर आलं आहे.

 

News English Summary: The Mahavikas Aghadi government had decided to shift the car shed of Metro 3 in Are to Kanjur Marg due to environmental concerns. Mumbaikars were very happy with this decision. Environmentalists and youths who took to the streets in the Aarey Wachawa movement also thanked the state government. However, this was refuted by the Modi government at the Center and since then many allegations have been leveled. But now the Bharatiya Janata Party is likely to face off. Because now the Modi government is in trouble.

News English Title: Metro Kanjurmarg car shed permission was given by Modi government News updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x