23 November 2024 8:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

ST कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी २ महिन्यांचं वेतन देणार | टोकाचं पाऊल उचलू नका - राज्य सरकार

ST Conductor, Manoj Chodhari suicide, Jalgaon, Thackeray Government

मुंबई, ९ नोव्हेंबर: दिवाळीचा सण तोंडावर असताना पगार थकल्यानं जळगावात एका एस.टी कर्मचाऱ्यानं (ST Mahamandal Employee) गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तत्पूर्वी माझ्या आत्महत्येला ST महामंडळातील कार्यपद्धती व ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत या कंडक्टरनं टोकाचं पाऊलं टाकलं. जळगावमधील मनोज अनिल चौधरी या एस.टी कंडक्टरने (ST Mahamandal Counductor Manoj Anil Chaudhari) सोमवारी (९ नोव्हेंबर) गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चौधरी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे.

दरम्यान, पुढच्या अर्ध्या तासात एक महिन्याचे वेतन मिळेल आणि दिवाळीच्या आधी दुसरे वेतन मिळेल असे राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब (Minister Anil Parab) यांनी म्हटले. पत्रकार परिषदेत माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकार देखील आर्थिक संकटात आहे. पण हताश होऊ नका. आत्महत्या करु नका. हे तात्पुरते संकट आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे जीवन पुर्वपद करण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यामुळे टोकाचे पाऊल उचलू नको असे आवाहन परब यांनी केले.

पूर्ण वेतन मिळावे अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. यासाठी बॅंकेकडे कर्ज मागितले आहे. महाराष्ट्र शासनाला विनंती केल्याचे ते म्हणाले. गेल्या काही दिवसात २ एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. दिवाळीच्या पार्श्वभुमीवर कर्मचारी चिंतेत आहेत. दोन महिन्याचे पगार द्या आणि तिसऱ्या महिन्याचा पगार कधी देणार ते सांगा असे इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड (Intak President Jayprakash Chhajed) यांनी म्हटलंय. अन्यथा आमचा नाईलाज होईल असे म्हटलंय.

 

News English Summary: A shocking incident has taken place in Jalgaon where an ST employee (ST Mahamandal Employee) committed suicide by strangulation due to salary fatigue while Diwali was on the horizon. Earlier, the conductor took extreme measures, alleging that the ST Corporation and the Thackeray government were responsible for my suicide. ST conductor Manoj Anil Chaudhari from Jalgaon committed suicide by hanging himself on Monday (November 9). Chaudhary also wrote a suicide note before committing suicide.

News English Title: ST Conductor Manoj Chodhari suicide in Jalgaon Thackeray Government News updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x