4 December 2024 2:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Investment Tips | असा वाढेल पैशाने पैसा, तुमच्याकडील पैसे पुन्हा होतील डबल; या पर्यायांमध्ये गुंतवणूक करा - Marathi News Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IPO GMP | स्वस्त IPO आला रे, ग्रे-मार्केट'मध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल - GMP IPO 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगा'बाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धक्का Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SUZLON Horoscope Today | काहींचा सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढेल तर काहींना मिळेल यशाची गुरुकिल्ली, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, मजबूत कमाई होणार - NSE: HAL
x

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी भाजप अर्नबला वाचवतंय की स्वतःला? | सविस्तर वृत्त

BJP stand, behind Arnab Goswami, Republic TV

मुंबई, ९ नोव्हेंबर: रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी (Republic TV Editor Arnab Goswami) यांच्यासाठी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadnavis) हे मैदानात उतरले आहेत. फडणवीस यांनी ट्विट करुन अर्णब गोस्वामी प्रकरणात उच्च न्यायालयाने स्यूमोटो याचिका दाखल करण्याची मागणी केली. अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यापासून ते न्यायालयीन कोठडीत त्यांना ज्याप्रकारे वागणूक दिली जात आहे, याबाबत बऱ्याच चर्चा सुरु आहेत. या सगळ्याची कोर्टाने दखल घ्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तत्पूर्वी भारतीय जनता पक्षाने देशभर आंदोलनं करून अर्नबचा बचाव केला होता.

मात्र आता गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी अन्वय नाईक कुटुंबियांच्या तक्रारीनंतर तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांची चौकशीचे आदेश दिले आहेत. आज उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) देखील जामीनाच्या सुनावणी वेळी सदर प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलं आहे. त्यात फडणवीस मुख्यमंत्री असताना अर्नबला चौकशीदरम्यान विशेष व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाल्याचं समोर आलं आहे. त्याचा उल्लेख अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने पत्रकार परिषदेत देखील केला होता. मात्र त्यानंतर अजून धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री निया गृहमंत्री असताना याप्रकरणी 2019 सालची एक क्लोजर रिपोर्ट समोर आली आहे. त्यावरुन, तत्कालीन पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वर्तमानपत्राच्या अनुसार सुरेश वरडे यांच्याद्वारे तपास करण्यात आलेल्या अहवालानुसार, याप्रकरणात अर्णब गोस्वामी यांच्यासह अटक करण्यात आलेल्या इतर दोघांकडून अन्वय नाईक यांना पैसे येणे होते. तसेच, अहवालात असेही म्हटले आहे की, अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचं कुठेही आढळून येत नाही. विशेष म्हणजे अन्वय नाईक हे गेल्या 6 ते 7 वर्षांपासून आर्थिक संकटात होते. त्यामुळेच, अन्वय यांनी सुरुवातील आपल्या आईचा गळा आवळून खून केला. त्यानंतर, स्वत: आत्महत्या केली. यासंदर्भात झी न्यूज हिंदीने इंडियन एक्सप्रेसच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.

अंतरिम जामीन देऊ नये; नाईक कुटुंबीयांनी केला होता विरोध:
नाईक यांच्या आत्महत्येचे प्रकरण बंद करण्याची विनंती करणारा अहवाल रायगड पोलिसांनी कनिष्ठ न्यायालयात दाखल केला आणि न्यायालयानेही आमचे म्हणणे ऐकल्याशिवाय तो बंद केला. आम्हाला अंधारात ठेवण्यात आले, असा आरोप नाईक कुटुंबीयांतर्फे अ‍ॅड्. शिरीष गुप्ते यांनी केला. आताही न्यायालयाने आदेश दिल्यावर आम्हाला प्रतिवादी करण्यात आले. हे प्रकरण आधीच्या तपास यंत्रणेने मनमानीपणे हाताळले. आता त्याचा योग्य तपास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे तपास सुरू असताना आरोपींना उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन देऊ नये, अशी विनंती गुप्ते यांनी न्यायालयाला केली.

 

News English Summary: Opposition leader Devendra Fadnavis is now in the fray for Republic TV editor and journalist Arnab Goswami. Fadnavis tweeted that the High Court should file a Sumoto petition in the Arnab Goswami case. Since the arrest of Arnab Goswami, there has been a lot of talk about the way he is being treated in judicial custody. Devendra Fadnavis has demanded that the court should take notice of all this. Earlier, the Bharatiya Janata Party (BJP) had staged a nationwide agitation to defend Arnab.

News English Title: BJP stand behind Arnab Goswami or anything else is the reason news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x