22 November 2024 4:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

आधीच्या सरकारनं गोस्वामींना पाठीशी घातलं का? | हा चौकशीचा भाग आहे - अशोक चव्हाण

Minister Ashok Chavan, Fadnavis government, Arnab Goswami

मुंबई, ९ नोव्हेंबर: रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Republic TV editor Arnab Goswami) यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. परंतु, हायकोर्टात देखील गोस्वामी यांना दिलासा मिळाला नाही. मुंबई हायकोर्टानं त्यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला (Mumbai High Court rejected Interim bail to Arnab Goswami). त्याचबरोबर कनिष्ठ न्यायालयात जाण्याचे आदेश गोस्वामी यांना दिले आहेत.

दरम्यान, वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या चौकशीला अलिबाग सत्र न्यायालयाने आज हिरवा कंदील दाखवला आहे आणि त्यामुळे अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. गोस्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं असून, तिथेच दररोज तब्बल ३ तास चौकशी करण्याची परवानगी कोर्टाने पोलिसांना दिली आहे.

रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक प्रकरणात अटक केली होती. कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या चौकशीसाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी कोर्टाकडे केली होती. कोर्टाने पोलिसांच्या मागणीनंतर दररोज ३ तास चौकशी करण्याची परवानगी रायगड पोलिसांना दिली आहे.

दरम्यान, आज ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या ‘माझी भिंत’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला अशोक चव्हाण उपस्थित होते. राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. त्यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अशोक चव्हाण (PWD Minister Ashok Chavan) यांनी अर्णब गोस्वामींवर टीकास्त्र सोडलं. इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली. गोस्वामींसह तिघांनी आपले पैसे थकवल्यानं आपण आत्महत्या करत असल्याचं चिठ्ठीत लिहून नाईक यांनी २०१८ मध्ये आत्महत्या केली. मात्र या प्रकरणाची फाईल फडणवीस सरकारनं बंद केली. यावरही चव्हाण यांनी भाष्य केलं. ‘आधीच्या सरकारनं गोस्वामींना पाठीशी घातलं का, हा चौकशीचा भाग आहे,’ असं चव्हाण म्हणाले.

 

News English Summary: Ashok Chavan was present at the launch of Rajendra Darda’s book ‘My Wall’, editor-in-chief of ‘Lokmat’ today. The book was published by Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan. At that time, while interacting with the media, PWD Minister Ashok Chavan castigated Arnab Goswami.

News English Title: Minister Ashok Chavan criticized former Fadnavis government over protecting Arnab Goswami news updates.

हॅशटॅग्स

#AshokChavan(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x