24 November 2024 5:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

BREAKING | एनडीए'ला आघाडी | पण तब्बल ४० जागांवर फक्त १ हजार मतांचा फरक

Bihar Assembly Election 2020, vote counting, NDA, Mahagathbandhan votes

पाटणा, १० नोव्हेंबर: बिहार विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार असून सध्या मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीला महागठबंधनच्या बाजूने दिसणारे कल आता एनडीएच्या बाजूने झुकल्याचे पाहायला मिळत आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाल्यानंतर साधारणा ९ ते १० वाजल्यापासून निकालाचे कल हाती येणार आहेत. देशातील, विशेषत: बिहारच्या ३ कोटींहून अधिक मतदारांसह ३,७३४ उमेदवारांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असतानाच नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने पराभव मान्य केला आहे. मतमोजणी सुरु झाल्यानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीने अनेक मतदारसंघात मोठी आघाडी घेतली होती. पण आता भारतीय जनता पक्ष प्रणीत एनडीए आणि महाविकास आघाडीमधील अंतर बरचं कमी झालं आहे. एनडीए आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढत सुरु आहे.

“लोकांनी जो कौल दिलाय, त्याचं आम्ही स्वागत करतो. राष्ट्रीय जनता दल किंवा तेजस्वी यादव यांनी आमचा पराभव केलेला नाही पण करोना व्हायरसमुळे आम्ही पराभूत झालो आहोत” असे जनता दल युनायटेडचे प्रवक्ते के.सी.त्यागी एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले.

  • एनडीने महाआघाडीला मागे सारत घेतली आघाडी. सध्या एनडीएला ११९ जागांवर आघाडी, तर महाआघाडी ११४ जागांवर पुढे
  • एनडीए ११९ जागांवर पुढे, महाआघाडी ११४ जागांवर पुढे. एलजेपीला ६ जागांवर आघाडी, तर इतरांना २ जागांवर आघाडी
  • भारतीय जनता पक्षाला सध्या २३.१८ टक्के मिळाली मते, तर जेडीयूच्या पारड्यात आतापर्यंत पडले १३.४८ टक्के मते
  • आतापर्यंत २०९ जागांचे कल हाती आले असून आरजेडीला ८४ जागांची तर भाजप ४९ जागांची आघाडी मिळाली आहे. तसेच काँग्रेस २३ जागांवर पुढे असून, एलजेपी २ आणि इतर १३ जागांवर आघाडीवर आहेत.

 

News English Summary: Nitish Kumar’s Janata Dal United party has conceded defeat in the Bihar Assembly polls. After the counting of votes began, the grand alliance led by Tejaswi Yadav had taken a big lead in many constituencies. But now the gap between the Bharatiya Janata Party-led NDA and the Mahavikas Aghadi has narrowed. The NDA and the Mahavikas Front are engaged in a fierce battle.

News English Title: Bihar Assembly Election 2020 vote counting with very small gap between NDA and Mahagathbandhan votes news updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x