25 November 2024 4:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO GTL Share Price | GTL पेनी शेअर तेजीने परतावा देणार, रिलायन्स कंपनी कनेक्शन, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337 Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
x

महाराष्ट्र सरकारने रिपब्लिक टीव्हीच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करायला हवं | सर्वोच्च न्यायालय

Supreme Court, democracy resilient, Maharashtra government, Arnabs taunt on TV

मुंबई, ११ नोव्हेंबर : इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी अंतरीम जामिनासाठी मंगळवारी सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेवर आज म्हणजे बुधवारी सुनावणी पार पडत असून न्यायालयात जोरदार युक्तिवाद सुरु झाला आहे. जस्टीस धनंजय चंद्रचूड आणि जस्टीस. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठात अर्णव गोस्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी सध्या सुरु आहे. मुंबई हायकोर्टाने सोमवारी याप्रकरणी अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता आणि कनिष्ठ कोर्टात जाण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर अर्णव यांनी अधिवक्ता निर्निमेष दुबे यांच्याद्वारे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

दरम्यान या अपिलवर आज सकाळी १०.३० वाजता सुनावणी सुरु झाली आहे. मुंबई हायकोर्टाने ९ नोव्हेंबरला अर्णव गोस्वामी आणि इतर २ आरोपींना अंतरीम जामीन देण्यास स्पष्ट नकार दिला होता. तसेच कनिष्ठ न्यायालयात दाद मागण्यास सांगितले होते. तसेच आरोपी आपल्या ‘बेकायदा अटके’ला आव्हान देत असतील आणि जामीन अर्ज दाखल करीत असतील, तर कनिष्ठ न्यायालय यावर ४ दिवसांत निर्णय देईल, असेही हायकोर्टाने म्हटले होते.

दरम्याम देशभरात हजारो सामान्य नागरिक न्यायाच्या प्रतीक्षेत असताना आणि कोर्टासमोर प्रकरणे न आल्याने हजारोजण तुरुंगातच असताना रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना इतकी विशेष सवलत का दिली जाते,’ असा सवाल सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष दुष्यंत दवे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरचिटणीसांना पाठविले आहे. रिपब्लिकचे अर्णव गोस्वामी यांना जामीन नाकारल्याने त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून, त्यांच्या अर्जावर आज, बुधवारी सुनावणी सुरु झाली आहे आहे. यावर दवे यांनी आक्षेप घेतला आहे.

दुसरीकडे न्यायालयात युक्तिवादाच्या वेळी अर्नबच्या वकिलांनी आरोप केला की अन्वय नाईक यांनी आईला ठार मारून नंतर आत्महत्या केली होती. तसेच याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील न्यायालयात केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने रिपब्लिक टीव्हीवरील टोमण्याकडे दुर्लक्ष करायला हवं असं देखील मत व्यक्त केलं आहे. पीटीआय’ने याबाबत अधिकृत वृत्त दिलं आहे.

 

News English Summary: During the argument in court, Arnab’s lawyers alleged that Anvay Naik had killed his mother and then committed suicide. It has also demanded a CBI probe into the matter. Meanwhile, the Maharashtra government has also expressed the view that the sarcasm on Republic TV should be ignored. PTI has given an official report in this regard.

News English Title: Supreme Court says our democracy is extraordinarily resilient, Maharashtra government must ignore all Arnabs taunts on TV news updates.

हॅशटॅग्स

#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x