22 November 2024 1:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

मोदी सरकार येण्यापूर्वीचा कायदेशीर व्यवहार | भाजपची रश्मी ठाकरेंविरुद्ध अर्थहीन बोंबाबोंब?

Former MP Kirit Somaiya, Rashmi Thackeray

मुंबई, ११ नोव्हेंबर : अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते भाजपच्या नेत्यांसाठी देखील झगडताना दिसले नसतील तितकी बोंबाबोंब सध्या ते आता करताना दिसत आहे. त्यासाठी ते कोणत्याही अर्थहीन विषयाचा संबंध अन्वय नाईक आणि अर्णब प्रकरणाशी जोडताना दिसत आहेत. यापूर्वी देखील समाज माध्यमांवर अन्वय नाईक कुटुंबियांच्या राहणीमानावरून त्यांना लक्ष केलं होतं.

वास्तविक त्याचा आणि सध्याच्या अर्णब प्रकरणाचा काहीही संबंध नव्हता पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजकीय दृष्ट्या दाबण्यासाठी आदित्य ठाकरे आणि आता रश्मी ठाकरे यांना लक्ष करण्याचा घाट घातला आहे अशी राजकीय चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र याचा काहीही फायदा होईल असं सध्या तरी दिसत नाही. कारण आजच्या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांनी किरीट सोमय्यांना या विषयाचा नेमका आधार, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण आणि रिपब्लिकने त्यांचे पैसे थकवणे याचा 21 मार्च 2014 मधील म्हणजे देशात मोदी सरकार येण्यापूर्वीच्या जमीन व्यवहाराशी काय संबंध असं विचारताच ते निरुत्तर दिसले. त्यांचा हेतू केवळ संभ्रम निर्माण करणं असल्याची त्यांची देहबोली सांगत होती.

किरीट सोमैया पत्रकार परिषदेत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि वास्तू सजावटकार अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असा दावा किरिट सोमय्या यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी हा व्यवहार का लपवला? मुख्यमंत्र्यांनी रेवदंडाजवळ जमीन का घेतली? असे अजून किती व्यवहार झाले आहेत? असा सवाल किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. त्याचबरोबर ठाकरे आणि नाईक कुटुंबात झालेल्या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.

अन्वय मधुकर नाईक, अक्षदा अन्वय नाईक, आज्ञा अन्वय नाईक, रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रविंद्र वायकर यांच्याबरोबर किल्ला कोर्लई येथील आजूबाजूची जमीन रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विकत घेतली. तेथून दोन किमीवर असलेलं देवदंडा ही माझी सासूरवाडी आहे. म्हणून या जागेचं महत्त्व माल कळतंय. 21 मार्च 2014 रोजी 2 कोटी 20 लाख रुपये ठाकरे परिवाराने नाईक परिवाराला दिले. अशाप्रकारचे किती व्यवहार झाले ते उद्धव ठाकरे सांगतील का? देवदंड माझी सासूरवाडी आहे. पण उद्धव ठाकरे यांनी तिथली जमीन विकत घेण्याचं कारण काय? किती जमिनी घेतल्या? एक गोष्ट मला समजत नाही, सातबाऱ्यावर संयुक्त नाव आहे. एका बाजूला अन्वय मधूकर नाईक, अक्षता नाईक, आज्ञा नाईक यांची नाव आहेत. पण काही लोकं जमिनी घेतात. स्वत:ला राहण्यासाठी घर, जमीन विकत घेतात. पण रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रविंद्र वायकर हे दोघं का आणि कसे एकत्रित आले? ठाकरे, नाईक जमीन व्यव्हाराची चौकशी व्हायला हवी. ठाकरे आणि वायकर परिवाराचे संयुक्त किती व्यव्हार झाले आहेत? याची चौकशी व्हावी. अन्वय नाईक प्रकरण एवढं गाजत आहे, या प्रकरणात एवढी तत्परता करण्यामागील कारण समोर यायला हवी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

वास्तविक 21 मार्च 2014 रोजी झालेल्या प्रकरणाचा आणि २०१८ मध्ये अर्नबच्या रिपब्लिक टीव्हीने त्यांच्या कंपनीचे पैसे थकवल्यावर त्यांनी आत्महत्या करण्याचा कोणताही संबंध नाही आणि विषय खरोखर गंभीर असता तर स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेणं अपेक्षित असताना त्याची जवाबदारी एका माजी खासदारवर का दिली हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. मात्र अन्वय नाईक प्रकरणावरून संभ्रम निर्माण करणारे अनेक विषय भाजप यापुढे देखील पुढे करेल अशी सध्य स्थिती आहे असं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे. त्याच मूळ कारण हे प्रकरण फडणवीसांच्या काळातील असून ते उद्या त्यांच्यावर शेकू नये म्हणून भाजप नते संभ्रम निर्माण करत असल्याचं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: The current Arnab case has nothing to do with it, but there is talk that Aditya Thackeray and now Rashmi Thackeray are being targeted for political pressure on Chief Minister Uddhav Thackeray. However, at present, it does not seem to be of any use. Because when the journalists present at today’s press conference asked Kirit Somaiya about the exact basis of the issue, the Naik suicide case and the repayment of his money by the Republic on March 21, 2014, which has nothing to do with the land deal before the Modi government came to power. His body language was saying that his intention was only to create confusion.

News English Title: Former MP Kirit Somaiya serious allegations against Rashmi Thackeray news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x