25 November 2024 12:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE
x

एक अर्थहीन ट्विट | सेनेच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त आणि साथीदारांना ठार मारले | काय लॉजिक?

Amruta Fadanvis, shivsena, Bihar Assembly Election 2020

मुंबई, १२ नोव्हेंबर: बिहार विधानसभेच्या प्रचारात देशातील दिग्गज नेत्यांना केवळ ३१ वर्षांचा तरुणाने घाम फोडला. निवडणुच्या प्रचारात देशभरातील भाजपा नेत्यांची फळी बिहारमध्ये पाहायला मिळाली होती. भाजपचे अनेक राज्यातील मुख्यमंत्री, आमदार आणि खासदार सुद्धा भाजपच्या प्रचारासाठी बिहारमध्ये तळ ठोकून होते. मात्र तेजस्वी यादव या तरुण नेत्यानेच खरी छाप सोडली आणि ती भविष्यात देखील कायम राहतील यात शंका नाही.

दरम्यान, भारतीय जनता पक्षप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात NDA ने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. एकूण २४३ जागांपैकी NDA ने १२५ जागा मिळवल्या आहेत. या १२५ जागांमध्ये ७४ जागा भाजपाने, ४३ जागा जदयूने तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. दुसरीकडे महाआघाडीने ११० जागा मिळवल्या आहेत. यामध्ये सर्वात चांगली कामगिरी केली आहे ती राजदने. तेजस्वी यादव यांचा राजद हा ७५ जागा मिळवत बिहारमधला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महाआघाडीतल्या काँग्रेसला १९ जागांवर तर डाव्यांना १६ जागांवर विजय मिळाला आहे.

मात्र दुसरीकडे या निवडणुकीमध्ये ५० जागा लढवणाऱ्या शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मतं मिळाली आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकडेवरीनुसार दुपारीपर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये शिवसेनेला ०.०५ टक्के मत मिळाली आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झालं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शिवसेनेपेक्षा नोटाला अधिक १.७४ टक्के मतं मिळाली आहेत.

दरम्यान, या निकालांवरून अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये शिवसेनेचा ‘शवसेना’ असा उल्लेख केला आहे. अमृता यांनी देवेंद्र फडणवीसांनी एनडीएने बिहारमध्ये विजय मिळवल्यानंतर दिलेल्या मुलाखतीचा एक छोटा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये फडणवीसांनी शिवसेनेने कशाप्रकारे बिहारमधील निवडणुकीमध्ये खराब कामगिरी करत आपलं हसं करुन घेतलं आहे याबद्दल भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे फडणवीस यांनी या मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधीतरी बिहारमध्ये काही जागा निवडून यायच्या मात्र आता तेही झालं नाही असं म्हणतं शिवसेनेबरोबर सध्या सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादीलाही टोला लगावला आहे. याचवरुन अमृता यांनी शिवसेनेने आपल्या साथीदारांना बिहारमध्ये ठार मारले अशी टीका ट्विटवरुन केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी, “महाराष्ट्र कुठे ही नेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेउन ठेवल्या बाबत धन्यवाद,” असं म्हणत बिहारमधील मतदारांचे आभार मानले आहेत.

 

News English Summary: Shiv Sena, which is contesting 50 seats in the Bihar Assembly elections, has got less votes than notes. According to the Election Commission of India’s website, the Shiv Sena polled 0.05 per cent votes in the counting till noon. Deposits of Shiv Sena candidates have been confiscated in many places. Surprisingly, Nota got 1.74 per cent more votes than Shiv Sena.

News English Title: Amruta Fadanvis Says shivsena Killed The Alliance Parties In Bihar Assembly Election 2020 News updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x