27 April 2025 2:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | पीएसयू शेअरने दिला 353 टक्के परतावा, आता फायद्याची अपडेट आली, टार्गेट जाणून घ्या - NSE: SJVN Mazagon Dock Share Price | बिनधास्त खरेदी करावा हा मल्टिबॅगर शेअर, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MAZDOCK Reliance Share Price | भरवशाचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RELIANCE Vikas Lifecare Share Price | 2 रुपये 55 पैशाचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL Gratuity on Salary | नोकरदारांनो, तुमच्या खात्यात ग्रेच्युटीची 1,38,461 रुपये रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI च्या या फंडात डोळे झाकून गुंतवणूक करा, 5 पटींनी पैसा वाढवा, सविस्तर जाणून घ्या
x

VIDEO | भाजपच्या आमदाराची भाजपच्या महिला नगरसेविकेला जबर मारहाण

BJP MLA, Manhandles, woman party member, Karnataka S Bagalkot

बंगळुरू, १२ नोव्हेंबर: याघडीला समाज माध्यमांवर भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने एका महिला नगरसेवकाला जबर मारहाण केल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. या व्हिडीओनंतर भारतीय जनता पक्षावर तुफान टीका सुरु झाली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ कर्नाटकातील असल्याचं समोर आलं आहे, तेरदळ येथील महिला नगरसेवकाला मारहाण करतानाचा भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने भारतीय जनता पक्षावर सर्वबाजुने टीका होऊ लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविक सविता हुरकादली, चांदनी नायक आणि गोदावरी बाट यांनी पक्षाच्या नेत्यांना सांगितले होते की, त्यांना देखील अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची संधी बहाल करावी. परंतु, पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी त्यांची ही मागणी दुर्लक्ष करत फेटाळून लावली होती. त्यानंतर नगरसेविका सविता हुरकादली यांच्यावर काँग्रेसच्या उमेदवाराला मदत केल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने करत त्यांना जबर मारहाण केली, त्यावेळी मोठ्या संख्येने पोलीस उपस्थित असताना देखील त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप नगरसेविका सविता हरकादली यांनी केला आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, ही घटना ९ नोव्हेंबर रोजी घडली. परंतु, या घटनेसाठी सावदी यांनी कॉंग्रेसला जबाबदार धरले आहे.

 

News English Summary: Bharatiya Janata Party corporators Savita Hurkadali, Chandni Nayak and Godavari Bat had told party leaders that they too should be given a chance to contest for the post of president and vice-president. However, local party leaders ignored his demand and rejected it. Later, a BJP MLA accused corporator Savita Hurkadali of helping the Congress candidate and beat her up.

News English Title: BJP MLA Manhandles woman party member in Karnataka S Bagalkot News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या