22 November 2024 8:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO
x

मुलींना उचलून आणणारे नेते महिला सुरक्षेवर बोलत आहे हाच मोठा विनोद - नीलम गोऱ्हे

Shivsena MLA Neelam Gorhe, BJP MLA Ram Kadam

मुंबई, १२ नोव्हेंबर: अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजप दरम्यान आरोप प्रत्यारोपांची मालिका अजून सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी एका जमिनीच्या व्यवहारावरून थेट रश्मी ठाकरे यांना लक्ष केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. मात्र त्यात अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून या वादात उडी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांना लक्ष केलं होतं.

भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबात जमिनीचे २१ व्यवहार झाल्याचा दावा केला आहे. याआधी किरीट सोमय्या यांनी ट्विट करत रश्मी ठाकरे आणि मनिषा रवींद्र वायकर यांच्या नावे जमीन व्यवहार झाल्याची कागदपत्रं समाज माध्यमांवर शेअर केली होती. अमृता फडणवीस यांनीही रिट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. शिवसेना आमदार निलम गोऱ्हे यांनी या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.

निलम गोऱ्हे पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी याविषयावर भाष्य केलं. आमदार राम कदम यांच्यावर टीका करताना निलम गोऱ्हे यांनी मुलींना उचलून आणणारे नेते महिला सुरक्षेवर बोलत आहे. हाच सर्वात मोठा विनोद आहे अशी टीका देखील केली.

 

News English Summary: Shivsena leader Neelam Gorhe spoke to the media at a press conference in Pune, at which he commented on the issue. Criticizing MLA Ram Kadam, Neelam Gorhe said the leader who picked up the girls was talking about women’s safety. She also criticized that this is the biggest joke.

News English Title: Shivsena MLA Neelam Gorhe slams BJP MLA Ram Kadam news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x