19 April 2025 10:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

काश्मीरमध्ये पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन | २ जवान शहीद | ४ नागरिकांचाही मृत्यू

Ceasefire violation, Pakistan, Jammu Kashmir, BSF Jawan martyred

जम्मू, १३ नोव्हेंबर : सणाच्या तोंडावरच पाकस्तानने (Pakistan) आपल्या भ्याडपणा दाखवत शुक्रवारी नियंत्रण रेषेवर (LOC) विविध भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन (ceasefire violation) केले. या दरम्यान भारताचा एक जवान शहीद झाला असून एका भारतीय नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. तर आणखी एक नागरिक जखमी झाला आहे. जखमी नागरिकास जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतीय लष्कराने दिलेल्या माहिती नुसार, नियंत्रण रेषेजवळ करेनपासून ते उरी सेक्टरपर्यंत अनेक ठिकाणी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय लष्कर पाकिस्तानी सैन्याला सडेतोड उत्तर देत आहे.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) उपनिरीक्षक शहीद झाले आहेत. राकेश डोवल असं अधिकाऱ्याचं नाव आहे. दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास झालेल्या गोळीबारात ते जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला मार लागला होता. उपचारादरम्यान ते शहीद झाले. याशिवाय एक जवान कॉन्स्टेबल वासू राजा जखमी आहे. त्याचा हात आणि तोंड जखमी आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, बारामुल्लामध्ये पाकिस्तानने केलेल्य़ा गोळीबारात बीएसएफचे सबइन्स्पेक्टर राकेश डोवाल शहीद झाले. तसेच तीन नागरिक मृत्यूमुखी पडले असून जवळपास 6 जण जखमी झाले आहेत. यानंतर बीएसएफने लगेचच पाकड्यांना प्रत्यूत्तर दिले असून यामध्ये 7 ते 8 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. यामध्ये स्पेशल सर्व्हिस ग्रुपचे 2-3 कमांडो ठार झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

News English Summary: 7-8 Pakistan Army soldiers killed in retaliatory firing by Indian Army in response to ceasefire violations from across Line of Control. The list of Pakistan Army soldiers killed includes 2-3 Pakistan Army Special Service Group (SSG) commandoes: Indian Army sources.

News English Title: Ceasefire violation by Pakistan in Jammu Kashmir a BSF Jawan martyred and a civilian killed News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Indian Army(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या