LIC मधील केंद्राच्या भागीदारी विक्रीला वेग | LIC'च्या मूल्यमापनासाठी अर्ज मागवले
नवी दिल्ली, १७ नोव्हेंबर: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा IPO आणण्याच्या प्रक्रियेला सरकारने वेग दिला आहे. पण शेअर बाजारात त्याची लिस्टिंग वेगळी असू शकते. सीएनबीसीने गेल्या महिन्यात दिलेल्या वृत्तानुसार, देशातील सरकारी विमा कंपनी LICचा आयपीओ आतापर्यंतचा भारताचा सर्वात मोठा आयपीओ असल्याचे सिद्ध होऊ शकते.
लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा 25 टक्के हिस्सा विकण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून सरकार किरकोळ गुंतवणूकदारांना बोनस आणि सवलत देण्यावर विचार करीत आहे. वित्तीय सेवा विभागाने LICमधील भागभांडवल विक्रीचा आराखडा तयार केला असून तो सेबी, आयआरडीए आणि एनआयटीआय आयोगासह संबंधित मंत्रालयांना पाठविला आहे. या संपूर्ण प्रकरणाविषयी माहिती असलेल्या एकानं सांगितले की, कंपनीला भागभांडवल 100 टक्क्यांवरून 75 टक्क्यांपर्यंत कमी करावयाचे आहे.
दुसरीकडे देशात निर्माण झालेल्या आर्थिक गर्तेतून अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकारनं निर्गुंतवणुकीच्या धोरणावर जोर दिला असून, तब्बल २६ कंपन्यांचं खासगीकरण करण्याच्या दिशेनं पावलं टाकली आहेत. यातील २३ कंपन्यांना केंद्रानं मंजूरी दिली आहे. त्यातच आता भारतीय जीवन विमा महामंडळ अर्थात एलआयसीतील सरकारची २५ टक्के भागीदारी विकणार असल्याचं वृत्त आहे.
दरम्यान, भारतीय जीवन विमा महामंडळातील (एलआयसी) आपला वाटा विकण्यासाठी केंद्र सरकरा अॅक्शन मोडमध्ये आले आहे. यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. एलआयसीच्या मूल्यमापनासाठी अर्थमंत्रालयाने अर्ज मागवले आहेत. यासाठी संबंधित कंपन्यांना 8 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
ही एक सामान्य प्रकारची मुल्यमापन पद्धत आहे. यात कंपनीची सध्याची संपत्ती आणि सध्या सुरू असलेल्या विमा पॉलिसिजमधून मिळणारा लाभ एकत्र केला जातो. एलआयसीमधील आंशिक भागीदारी विकून ती शेअर बाजारात सूचीबद्ध कराण्याची सरकारची योजना आहे. सुरू असलेल्या आर्थिक वर्षातच ही विकण्याची सरकारची इच्छा आहे.
IPOच्या माध्यमाने विक्री – IPOच्या माध्यमाने याची विक्री होईल. यासाठी केंद्र सरकारने डेलॉयट आणि एसबीआय कॅपिटलला आयपीओपूर्वी व्यवहारासाठी सल्लागार नेमले आहे. 2.10 लाख कोटी रुपये जमवण्याचे लक्ष्य – सरकारने या आर्थिक वर्षात भागीदारी विक्रीतून 2.10 लाख कोटी रुपये जमविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यांपैकी 1.20 लाख कोटी रुपये केंद्रीय उपक्रमांत निर्गुंतवणूक करून जमवले जातील. एअर इंडिया आणि बीपीसीएलदेखील रांगेत – जवळपास 90 हजार कोटी रुपये आर्थिक संस्थांतील भागीदारीच्या विक्रीतून येतील. ही रक्कम जमवण्यासाठी सरकार एलआयसी शिवाय, एअर इंडिया आणि बीपीसीएलमधील भागही विकण्याच्या तयारीत आहे.
News English Summary: The Central Government has entered into action mode to sell its stake in Life Insurance Corporation of India (LIC). The government has taken a big step for this. The Ministry of Finance has invited applications for evaluation of LIC. The concerned companies will be able to submit applications till December 8. This is a common type of evaluation method. It combines the company’s current assets and benefits from current insurance policies. The government plans to sell its partial stake in LIC and list it on the stock exchange. The government intends to sell it in the current financial year.
News English Title: Modi government ministry of finance invited applications actuarial companies evaluate LIC News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार